Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया का केली जाते साजरी? दिवसाचं महत्त्व आणि पौराणिक श्रद्धा माहिती आहेत?

Akshaya Tritiya 2024 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेची तिथी..., अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फक्त शुभकार्य, दान नाहीतर, पितरांसाठी करा 'हे' काम, होईल लाभ, जाणून घ्या काय आहे पौराणिक श्रद्धा

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया का केली जाते साजरी? दिवसाचं महत्त्व आणि पौराणिक श्रद्धा माहिती आहेत?
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 9:55 AM

शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेची तिथी आज आहे. वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. या दिवसाचं खास महत्त्व आहे. अक्षय्य तृतीयेचा दिवस हा वर्षातील शुभ दिवसांपैकी एक आहे. हा दिवस त्रेतायुगाचा प्रारंभही मानला जातो. या दिवशी केलेल्या कार्याचे शाश्वत फळ मिळतं असे देखील म्हणतात. ‘न क्षय इति अक्षय’ म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, तो अक्षय होय. त्यामुळे या दिवशी जे काही शुभ कार्य, उपासना किंवा दान वगैरे केले तर ते सर्व अक्षय्य होते.

अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर फक्त शुभकार्य, दान नाहीतर, या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि पिंड दान करण्याचेही महत्त्व आहे. पितरांसाठी मातीचे भांडे दान करावे. उन्हाळ्यात जलयुक्त घट दान अर्पण केल्याने पितरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभतो.

आजच्या दिवशी विष्णू भगवान यांची चंदनाने पूजा केली जाते. आज विष्णू भगवान यांची पूजा केल्यामुळे जीवनात आणि कुटुंबात आनंद आणि उत्साह कायम राहतो. जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख-समृद्धी आणि कुटुंबातील सर्वांमध्ये सामंजस्य टिकवायचे असेल, तर आज आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूची विधिवत पूजा करावी.

अक्षय्य तृतीयेचा हा दिवस माफीचा दिवस मानला जातो. असे म्हटले जाते की या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने आपल्या किंवा आपल्या प्रियजनांकडून नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर त्याच्या सर्व चुका माफ होतात आणि त्याला देवांकडून आशीर्वाद मिळतात. झालेल्या चुकांसाठी माफी मागण्याचा आजचा खास आणि अतिशय चांगला दिवस आहे.

अक्षय्य तृतीय्या दिवस का असतो खास?

पौराणिक श्रद्धांनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली. याशिवाय वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंतीही साजरी केली जाते. या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं. आज, परशुरामजींच्या मूर्तीची पूजा सूर्यास्तानंतर केली जाते. सण भारताच्या दक्षिण भागात साजरा केला जातो. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी वृंदावन स्थित श्री बांके बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं.

एवढंच नाही तर, आजच्या दिवशी उत्तराखंड येथील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात. नोव्हेंबरच्या आसपास बद्रीनारायणाचे दरवाजे जवळपास सहा महिने बंद असतात आणि आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हे दरवाजे उघडले जातात, पण मंदिराचे दरवाजे बंद असतानाही आतमध्ये अखंड ज्योत असते.

सांगायचं झालं तर, ज्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, त्या दिवशी सहा महिने पुरेल एवढ्या तुपाने भरलेला मोठा दिवा लावला जातो आणि ज्योत प्रज्वलित केली जाते. त्या दिवशी भगवान बद्रीनारायण यांची विशेष पूजा केली जाते. त्यानंतर मंदिरापासून 40 मैल अंतरावर असलेल्या ज्योतिर्मनच्या नरसिंह मंदिरात भगवंताची मूर्ती ठेवली जाते.

त्यानंतर आज म्हणजे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कपाट उघडल्यानंतर मुर्ती पुन्हा बद्रीनारायण मंदिरात ठेवली जाते. या मुहूर्तावर बद्रीनारायण देवाची विषेश पूजा केली जाते. पुजेसाठी भक्त लांबून देवाच्या दर्शनासाठी आणि अखंड ज्योत पाहण्यासाठी येत असतात.

( डिस्क्लेमर :वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.