Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध वडापाव गर्ल झाली ‘स्टार’; चंद्रिका दीक्षितचं पहिलं गाणं तुम्ही पाहिलंत का?

Vadapav Girl Chandrika Gera Dixit New Song Darji With Amandeep Singh : दिल्लीची प्रसिद्ध वडापाव गर्ल चंद्रिका दीक्षित हिचं पहिलं गाणं रिलीज झालं आहे. याचा व्हीडिओ सध्या ट्रेड होत आहे. वडापाव गर्लच्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. वाचा सविस्तर...

प्रसिद्ध वडापाव गर्ल झाली 'स्टार'; चंद्रिका दीक्षितचं पहिलं गाणं तुम्ही पाहिलंत का?
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 7:43 PM

मुंबई स्टाईल वडापावची राजधानी दिल्लीत विक्री करणाऱ्या प्रसिद्ध वडापाव गर्ल चंद्रिका गेरा दीक्षित ही सातत्याने चर्चेत असते. तिच्या बोलण्याच्या शैलीमुळे ती चर्चेत आली. वडापाव विक्रेत्या चंद्रिकाचा मोठा चाहता वर्ग आहे. आता वडापाव गर्लने नव्या क्षेत्रात पाऊल टाकलंय.चंद्रिका गेरा दीक्षित हिचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. या गाण्यामुळे चंद्रिका गेरा दीक्षित पुन्हा एकदा चर्चेत आहे. तिच्या गाण्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

‘वडापाव गर्ल’ चं नवं गाणं

चंद्रिका गेरा दीक्षित हिचं गाणं नुकतंच रिलीज झालं आहे. ‘दर्जी’ हे तिचं नवं गाणं आहे. गायक अमनदिप सिंग याच्यासोबत चंद्रिकाचं नवं गाणं रिलीज झालं आहे. गायक अमनदिप सिंग याने हे गाणं गायलं आहे. तसंच या गाण्यात अभिनय देखील केला आहे. तर या गाण्याचा प्रोड्युसर देखील अमनदिप सिंग हाच आहे. या गाण्यात चंद्रिका गेरा दीक्षित हिने अभिनय केला आहे. तिच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

चंद्रिकाचं ग्लॅमरस रूप

‘दर्जी’ या गाण्यात चंद्रिका प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर तिच्या लूक्सची प्रचंड चर्चा होतेय. गायक अमनदिप सिंग आलेलं तिचं गाणं सध्या चर्चेत आहे. तिच्या या गाण्याला आतापर्यंत 66 हजार लोकांनी पाहिलं आहे. तर अनेकांना तिचं हे गाणं आवडलं आहे. तिच्या अभिनयाचंही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.

सामान्य वडापाव विक्रेती ते प्रसिद्ध वडापाव गर्ल असा चंद्रिकाचा प्रवास आहे. यूट्यूबर्सने चंद्रिकाचे व्हीडिओ पोस्ट केले. त्यानंतर चंद्रिका प्रसिद्धी झोतात आली. इन्स्टाग्रामवर तिचे रील्स व्हायरल झाले. इन्स्टाग्रामवर आता तिचे साडे तीन लाखांच्या आपसपास फॉलोव्हर्स आहेत. सोशल मीडियावर तिच्या व्हीडिओंना लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळतात. चंद्रिका आधी गाड्यावर वडापाव विकत होती. लोक रांगा लावून तिच्याकडे वडापाव खाण्यासाठी येतात. आता तिने तिचं नवं दुकान सुरु केलं आहे.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.