Chanakya Niti : आयुष्यात पैसा टिकवायचा असेल तर ही आहे चाणक्य नीति, लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज

| Updated on: Mar 09, 2021 | 7:22 AM

आयुष्यात जर चाणक्याची धोरणं वापरली तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामात कधीच अपयश येऊ शकत नाही. चाणक्यांनी पैशासंदर्भातही काही नियम दिले आहेत.

Chanakya Niti : आयुष्यात पैसा टिकवायचा असेल तर ही आहे चाणक्य नीति, लक्ष्मी कधीही होणार नाही नाराज
Follow us on

आचार्य चाणक्य यांनी रचलेला चाणक्य नीति ग्रंथ जीवनाशी संबंधित सर्व समस्यांचं निवारण करतो. असं मानलं जातं की, आयुष्यात जर चाणक्याची धोरणं वापरली तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या कामात कधीच अपयश येऊ शकत नाही. चाणक्यांनी पैशासंदर्भातही काही नियम दिले आहेत. (acharya chanakya how earn money and save money financial constraints in life)

चाणक्यांनी दिलेल्या नीतिनुसार, अहंकाराचं मोठं कारण म्हणजे अधिक पैसे आहेत. भगवान श्रीकृष्णानेही अहंकाराबद्दल अर्जुनाला सांगितलं की, अहंकार माणसाला सर्वनाशाकडे नेतो. संपत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाची आवश्यकता पूर्ण करणे होय.

कधीही पैसे वाया घालवू नका

चाणक्य नितीनुसार, श्रीमंतीची देवी म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी चंचल स्वभावाची आहेत. ती कधीही एकाच ठिकाणी राहत नाही. जर आई लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती प्राप्त झाली असेल तर ते पैसे व्यर्थ घालवू नयेत. पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर करू नका. चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तीने पैशाची बचत केली आणि अनावश्यक गोष्टींवर पैसा खर्च केला नाही अशा व्यक्तीला लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.

प्रत्येक व्यक्तीने पैशांची बचत केली पाहिजे. कारण, आपल्या कठीण काळामध्ये पैसाच आपला मित्र असतो. जेव्हा एखादी वाईट वेळ येते तेव्हा आपले निकटचे मित्रदेखील निघून जातात. पण अशावेळी पैसा कामाला येतो.

एखाद्याचे नुकसान करण्यासाठी पैशाचा वापर करु नका

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैशाचा वापर नेहमी शुभ कार्यात करा. कोणालाही इजा करण्यासाठी कधीही पैशाचा वापर करू नका. आई लक्ष्मी अशा लोकांवर रागावते आणि आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. (acharya chanakya how earn money and save money financial constraints in life)

संबंधित बातम्या – 

Mahashivratri 2021 | घरात शिवलिंग ठेवण्यापूर्वी वाचा महत्त्वाचे नियम, अन्यथा निर्माण होतील अनेक अडचणी!  

बुद्धांची ही गोष्ट तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल, वाचा Motivational Story

MahaShivratri 2021 | तुळशीची पानं आणि केतकीचं फुलं महादेवाला वर्ज्य, जाणून घ्या या मागील पौराणिक कथा

(acharya chanakya how earn money and save money financial constraints in life)