
Baba Vanga Predictions: जगप्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा यांचं पूर्ण नाव वेंगेलिया पांडेवा गुश्टेरोवा असं होतं. त्या बल्गेरिया येथील प्रसिद्ध महिला होत्या. भविष्यात होणाऱ्या घटनांबद्दल दूरदृष्टी आणि अंदाजासाठी त्या आजही ओळखल्या जातात. 31 जानेवारी 1911 रोजी ऑट्टोमन साम्राज्याच्या स्ट्रुमिका भागात जन्मलेल्या बाबा वेंगा यांची बालपणी एका अपघातामुळे दृष्टी गेली. मात्र, या घटनेनंतर भविष्यातील घडामोडी पाहण्याची आणि समजून घेण्याची विलक्षण क्षमता त्यांनी विकसित केली.
बाबा वेंगा यांनी आजपर्यंत अनेत भाकीत केलेत, त्यामधील काही खरे देखील ठरले आहेत. एवढंच नाही तर, बाबा वेंगा यांनी असं एक भाकीत केलंय ज्यामध्ये येत्या 20 वर्षात म्हणजे जवळपास 2043 मध्ये युरोप या देशात मुस्लिम सत्ता प्रस्थापित होईल आणि इस्लामिक राजवट प्रबळ होईल. हा अंदाज लोकसंख्याशास्त्रीय आणि सांस्कृतिक बदल विचारात घेतो, जे युरोपमधील महत्त्वपूर्ण बदल दर्शवतात.
बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकीतानुसार, 2076 पर्यंत जग पुन्हा कम्युनिस्ट विचारसरणीकडे वळेल. लोकशाही व्यवस्थेऐवजी समाजवाद बळकट होईल. ज्यामुळे साम्यवाद पुन्हा एकदा प्रबळ होऊ शकेल. हे भाकीत लोकशाही प्रणाली आणि व्यक्तीस्वातंत्र्यांपुढील संभाव्य आव्हानांना सूचित करते. सध्या कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव मर्यादित आहे, पण बाबा वेंगा यांच्या भाकितावरून या विचारसरणीला भविष्यात नवं बळ मिळू शकतं.
बाबा वेंगा यांच्या शेवटच्या भविष्यवाणीनुसार, 5079 नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे जगाचा अंत होईल. ही आपत्ती मानवनिर्मित नसून नैसर्गिक आपत्ती असेल. ज्यामुळे मानवतेचा अंत होईल… असा दावा देखील बाबा वेंगा यांनी केला आहे. दरम्यान, बाबा वेंगा यांनी केलेल्या या भाकीतावर भविष्यवाणीच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे बाबा वेंगांचे हे भाकीत कितपत खरे ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.