
बाबा वेंगा भविष्यवेत्ती म्हणून खूप नावजलेली आहे. नास्त्रेदमस नंतर तिला जगभरात मान्यता आहे. 3 ऑक्टोबर 1911 रोजी तिचा जन्म बल्गेरियात झाला होता. वयाच्या 86 व्या वर्षी 1996 मध्ये तिचा मृत्यू ओढावला. बाबा वेंगाच्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्याचा दावा करण्यात येतो. 9/11 अमेरिकन हल्ला, जपानची त्सुनामी, प्रिन्सेस डायना हिचा मृत्यू ही तिची भाकीत खरी ठरल्याचा दावा करण्यात येतो. तिने 2005 मध्ये या राशींना सुगीचे दिवस येतील. त्यांची भरभराट होईल. त्यांना बक्कळ पैसा मिळेल असा दावा केला आहे. काय आहे तिची या राशीविषयीचे भाकीत
मेष (Aries)
वांगाच्या म्हणण्यानुसार, हे राशीचे लोक 2025 साली खूप श्रीमंत होण्याची शक्यता आहे. त्यांच्या साहसी आणि परिवर्तनशील स्वभावामुळे आर्थिक प्रगती होऊ शकते. अचानक मोठे बदल होतील. त्यातून भविष्य बदलेल. अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर त्यांना आता सुगीचे दिवस येतील. त्यांना नोकरीत पदोन्नती अथवा इतर ठिकाणी संधी मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ (Taurus)
अथक प्रयत्नांच्या माध्यमातून, या राशीचे लोक आता आर्थिक सुख-समृद्धी अनुभवू शकतील. संयम आणि स्थैर्य यामुळे संचित संपत्ती वाढेल. त्यांच्यासाठी हे वर्ष आनंदाचे आणि हर्षवायूचे राहील. त्यांच्या मेहनतीला आता फळ मिळेल. या राशीला या वर्षात बक्कळ पैसा मिळेल. त्यांना वारसाहक्काने एखादा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini)
मिथुन राशीच्या व्यक्तीची सर्जनशीलता आणि संवादकौशल्य 2025 साली त्यांना आश्चर्यकारक आर्थिक लाभ देईल. सोशल नेटवर्किंगमुळे नवे आर्थिक मार्ग उघडतील .त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आतापर्यंतच्या कष्टाला झळाळी मिळेल. कष्टाचे चिज होईल. मिथुन राशीला सलग एकाच वळणावर मोठी वाट पाहायला लागली. त्यांचे काम मार्गी लागत नव्हते. आता त्यांना चांगला बदल दिसून येईल.
सिंह (Leo)
प्रभावी नेतृत्व, आत्मविश्वास आणि चांगल्या निर्णयांमुळे या राशीचे लोक नोकरीतील पदोन्नती, उत्पन्न वाढ आणि आर्थिक वृद्धी प्राप्त करतील. 2025 हे वर्ष या राशीच्या लोकांसाठी गोल्डन चान्स असेल. त्यांना करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. फायदेशीर संधीमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते.
डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.