
भाऊबीज हा सण प्रत्येक भावा-बहिणीसाठी खूप खास असतो. दिवाळीत येणारा हा खास दिवस सर्वच बहीण- भाऊ आनंदाने साजरा करातात. भावांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी, प्रगतीसाठी तसेच त्याच्या समृद्धीसाठी बहीण प्रार्थना करते. भावाला ओवाळाताना बहिण तिच्या भावाला टिळा लावते, अक्षता लावून त्याच्यासाठी प्रार्थना करते. पण तुम्हाला माहित आहे का की वास्तुशास्त्रानुसार, ओवाळताना भावाने कोणत्या दिशेने बसणे खूप शुभ मानले जाते? कारण ओवाळताना भाऊ कोणत्या दिशेने बसतो याचा थेट त्याच्या जीवनावर आणि नातेसंबंधांवर परिणाम होतो. तर, जाणून घेऊयाता की भाऊबिजेच्या दिवशी भावाने कोणत्या दिशेला बसावे तसचं बहिणीने भावाला कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत.
ओवाळताना भावाने कोणत्या दिशेला बसावे?
वास्तुशास्त्रानुसार, भावाला ओवाळताना किंवा टिळा लावताना त्याने नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे.
उत्तर दिशा ही संपत्ती आणि संधींची दिशा मानली जाते. या दिशेला टिळक लावल्याने तुमच्या भावाच्या करिअरमध्ये आणि आर्थिक जीवनात स्थिरता येते.
पूर्व दिशा ही ज्ञान, बुद्धी आणि सकारात्मक उर्जेची दिशा मानली जाते. या दिशेला तोंड करून टिळा लावल्याने नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि प्रेम वाढते.
बहिणीने भावाला ओवाळताना कोणत्या दिशेला बसावे?
जेव्हा भाऊ उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसतो तेव्हा बहिणीने दक्षिणेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसावे. यामुळे ऊर्जा संतुलन राखली जाते.
टिळा लावताना काय बोलावे?
टिळा लावताना चांगले विचार आणि आशीर्वाद मनात ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुमच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, प्रगतीसाठी आणि आनंद तसेच शांतीसाठी प्रार्थना करा. तुम्ही मानसिकरित्या “सौभाग्यवती भव” किंवा “आयुष्यमान भव” सारखे आशीर्वादाचे शब्द म्हणू शकता.
ओवाळताना भावाला कोणत्या वस्तू देणे शुभ मानले जाते?
भावाला भाऊबिजेला ओवाळताना त्याला काही वस्तू देणे शुभ मानले जाते . जसं की सुपारी किंवा नारळ द्यावा. वास्तुनुसार, या सर्व वस्तू सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहेत. तसेच या वस्तूंद्वारे त्यालाही सकारात्मक ऊर्जा मिळते.
रंगाचा करदोडा: भाऊबिजेला भावाला काळ्या रंगाचा करदोडाही आवर्जून दिला जातो. जेणे करून त्याचे वाईट शक्तींपासून रक्षण व्हावे
कोणत्या दिशेने बसणे टाळावे
वास्तुनुसार, भावाला ओवाळताना भावाने नैऋत्य किंवा पश्चिम-दक्षिण तोंड करून बसणे टाळावे. या दिशा जडपणा आणि अडथळे दर्शवतात. या दिशांना तोंड करून ओवाळल्याने दुःख किंवा संघर्ष होण्याची शक्यता वाढते.
वास्तुशास्त्रानुसार भाऊबिजेला दिशा आणि ऊर्जा तसेच त्याला दिलेल्या वस्तू या भावाच्या आयुष्यावर नक्कीच परिणाम करातात. त्यामुळे ते देताना खूप साऱ्या आशीर्वादासह, शुभेच्छांसह आणि सकारात्मकतेसह द्यावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)