‘या’ पाच लोकांचं मृत शरीर जाळणं म्हणजे महापाप; गरुड पुराण काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृत शरीराला अग्नी दिला जातो. त्याचं मृत शरीर जाळण्याची प्रथा आहे. मात्र त्यासाठी देखील काही नियम आहेत, हे सर्व नियम गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहेत.

या पाच लोकांचं मृत शरीर जाळणं म्हणजे महापाप; गरुड पुराण काय सांगतं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 14, 2025 | 8:59 PM

हिंदू धर्मामध्ये जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा त्याच्या मृत शरीराला अग्नी दिला जातो. त्याचं मृत शरीर जाळण्याची प्रथा आहे. मात्र त्यासाठी देखील काही नियम आहेत, हे सर्व नियम गरुड पुराणामध्ये सांगण्यात आले आहेत. गरुड पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या नियमांनुसार जर मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार झाले, तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो, असं मानलं जातं. मात्र गरुड पुराणात अशा पाच लोकांबद्दल देखील सांगण्यात आलं आहे, ज्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या मृतदेहांना कधीच जाळलं जात नाही. जाणून घेऊयात गरुड पुराणामध्ये नेमकं काय सांगितलं आहे आणि हे पाच लोक नेमके कोण आहेत?

11 वर्षांपेक्षा कमी वयाचा मुलगा

गरुड पुराणात दिलेल्या माहितीनुसार ज्या मुलाचं वय 11 वर्षांपेक्षा कमी आहे, अशा मुलाचा मृत्यू एखाद्या कारणामुळे झाल्यास त्याला जाळलं जात नाही तर त्याला जमिनीत दफन केलं जातं. हिंदू धर्मामध्ये 16 संस्कारांपैकी मुंज नावाचा एक संस्कार आहे, जर एखाद्या बालकाची मुंज, अर्थात उपनयन संस्कार झाला नसेल तर त्याला देखील अग्नी दिला जात नाही. तसेच जर एखाद्या मुलीचा मृत्यू हा मासिक पाळी येण्याच्या आधीच झाला तर तिला देखील अग्नी देऊ नये असं गरुड पुराण सांगतं.

साधू -संत यांचा मृतदेह

साधू -संत यांनी आपल्या कठोर तपश्चर्येच्या जोरावर आपल्या शरीरावर ताबा मिळवलेला असतो, त्यांना त्यांच्या शरीराचा मोह नसतो, त्यामुळे त्यांचा मृतदेह जाळू नये, तो देखील दफन करावा असं गरुड पुराण सांगतं.

सर्प दंशाने मृत्यू झालेली व्यक्ती

ज्या व्यक्तीचा मृत्यू हा सर्पदंशामुळे झाला आहे, त्याचं शरीर देखील जाळू नये असं गरुड पुराण सांगतं. मान्यतेनुसार अशा व्यक्तीच्या शरीरात काही दिवस सुक्ष्म प्राण असतो. त्यामुळे त्याचं शरीर दफन करण्यात यावं, असं गरुड पुराणात म्हटलं आहे.

संसर्गजन्य आजारांमुळे मृत्यू झालेली व्यक्ती 

जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू संसर्गजन्य आजारामुळे झाला असेल तर त्याचं देखील शरीर जाळू नये, त्याच्या मृतदेहाचं देखील दफन करण्यात यावं असं गरुड पुराणामध्ये सांगीतलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)