
प्रत्येकाने फेंगशुई हे नाव ऐकलं असेल. तर काहीजण त्या पद्धतीचा अवलंबही करताना दिसतात. त्यामुळे बऱ्यापैकी अनेकजणांना फेंगशुईचे नियम माहित असतील. फेंगशुईचा वापर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो. जसं की, ज्या लोकांना त्यांच्या नोकरीत किंवा जीवनात शांती हवी असते, त्यांच्या आयुष्यात फेंगशुईचे एक वेगळे स्थान असते. फेंगशुईच्या काही नियमांचे पालन केल्याने आयुष्यात सकारात्मक बदल होतात असं म्हटलं जातं
फेंगशुईमध्ये अनेक वस्तू असतात ज्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो. जाणून घेऊया त्या वस्तू नेमक्या कोणत्या.
ड्रॅगन टर्टल
ड्रॅगन टर्टल हा एक प्रसिद्ध फेंगशुई उपाय आहे जो आपल्याला जीवनात नशीब, संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यास मदत करतो. ते ऑफिसच्या उत्तर दिशेला ठेवल्याने व्यवसाय वाढतो आणि रखडलेली करिअरची कामे सोडवण्यास मदत होते असे म्हटलं जातं. ते तुमच्या ऑफिसमध्ये ठेवल्याने नकारात्मक उर्जेचा प्रभाव निघून जातो.
चिनी नाणी
चिनी नाणी संपत्ती आणि नशीब आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानली जातात. जर तुम्ही तीन चिनी नाणी लाल रिबनमध्ये बांधली आणि ती तुमच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये किंवा फाईलमध्ये ठेवली तर तुमची आर्थिक समृद्धी वाढते. मुख्य दरवाजाजवळ तीन नाणी ठेवल्याने किंवा एखाद्या लाल कपड्यात बांधून ते दाराच्या आतल्या बाजूने ठेवल्यास घरात पैशाची कमतरता भासणार नाही.
पाण्याचा कारंजे
फेंगशुईनुसार, पाण्याचा प्रवाह म्हणजे संपत्तीचा प्रवाह. ऑफिस असो वा घर, जिथे जिथे पाणी वाहत असलेली वस्तू किंवा छोटासा फोटो असेल तिथे ती वस्तू शुभ मानली जाते. अशा वस्तू ईशान्य दिशेला ठेवल्याने जास्तीत जास्त फायदा होतो आणि मनाला शांती देखील मिळते.
क्रिस्टल बॉल
से मानले जाते की तुमच्याभोवती क्रिस्टल बॉल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. जर ते ऑफिसात ठेवले तर सर्व कामाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांमध्ये चांगला समन्वय साधला जाईल . ते घरात ठेवल्याने सुख आणि शांती मिळते.
तर अशा काही फेंगशुईमध्ये वस्तू असतात ज्यांचा वेगवेगळ्या कारणांसाठी वापर केला जातो. तसेच फेंगशुईमध्ये प्रत्येक वस्तूंमागे अर्थ दडलेला असतो.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)