Chanakya Niti : या तीन चुका आयुष्यात कधीच करू नका, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहे, ज्या आजच्या काळात देखील माणसाला आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणात देतात.

Chanakya Niti : या तीन चुका आयुष्यात कधीच करू नका, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 7:24 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना आपलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा देतात. निऱाश झालेल्या मनात नवीन अशा निर्माण करण्याचं काम करतात. माणसाला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देतात. तसेच काय योग्य आणि काय अयोग्य हे देखील सांगतात. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात आयुष्यात अशा काही चुका असतात, ज्या माणसाने कधीच करता कामा नये. काही चुका अशा असतात, त्या जरी तुम्ही केल्या तर त्यातून तुम्हाला सुधारण्याची संधी मिळते. परंतु काही चुका या अशा असतात, की त्यातून तुम्हाल कीधीही सुधारण्याची संधी मिळू शकत नाही. चला तर मग चाणक्य यांनी काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

मातीला विसरू नका- माती अर्थात तुमचं मुळ गावाला कधीही विसरू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य म्हणतात अनेकजण नोकरी आणि कामधंद्यांच्या निमित्ताने मुळ गाव सोडतात, आणि त्यानंतर ते आपली माणसं आणि गाव यांना पूर्णपणे विसरून जातात. मात्र जेव्हा तुमच्यावर खर संकट येते, तेव्हा तुमचं गावच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं. त्यामुळे तुम्ही कुठेही असाल तरीही आपल्या मुळ गावाचा कधीच विसर पडू देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मित्रासोबत धेका – चाणक्य म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी असा मित्र असतोच तो आपल्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळात धावून येतो.त्यामुळे संकट काळात जे लोक आपल्यासोबत असतात, त्यांच्यासोबत कधीही धोका करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

शिक्षण- चाणक्य म्हणतात प्रत्येकाने शिक्षण हे घेतलंच पाहिजे. काही झालं तरी कोणीही अडाणी राहता काम नये, शिक्षणामुळेच प्रगतीचे नवे रस्ते खुले होत असतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us