AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा

आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. असा अंदजा हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख (weather expert Punjabrao Dakh) यांनी वर्तवला आहे.

Weather Update : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, या जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, पंजाबराव डख यांचा मोठा इशारा
weather expert Punjabrao Dakh rainfall forecastImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 8:24 PM
Share

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पिकं सुकून चालली आहेत, संपूर्ण ऑगस्ट महिना उलटला मात्र राज्यात एकही थेंब पाऊस पडलेला नाहीये. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहे. बळीराजाला पावसाची प्रतिक्षा आहे. त्यातच आता एक गुडन्यूज समोर आली आहे, राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना नवा अंदाज आता समोर आला आहे. पावसासंदर्भात दिलासा देणारी बातमी आहे.

काय आहे पावसाचा नवा अंदाज?

दोन, तीन आणि चार सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, राज्याचा विचार केल्यास नागपूरमध्ये तसेच पूर्व विदर्भात तीन, चार आणि पाच सप्टेंबर रोजी  जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच कमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणाम म्हणून पश्चिम विदर्भात देखील पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र विषेत: पुणे जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यात देखील चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात पुढील चार दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे, पावसाचं स्वरुप विखरूलेलं असेल म्हणजे कुठे पाऊस पडेल कुठे पडणार नाही, मात्र बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, ज्यामध्ये गोंदिया, भंडारा, वर्धा नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या सहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे. पश्चिम विदर्भात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. कारण तिकडे कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. चार सप्टेंबर पासून ते आठ सप्टेंबर पर्यंत विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. कमी दाबाचा पट्टा हा गुजरातकडे सरकत असल्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या काळात पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात देखील राज्यात चांगला पाऊस होणार आहे. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी भागात अगदी पालघरपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, आज रात्रीपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगलाच सक्रिय होणार आहे, असा अंदाज देखील हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

Follow Us
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल