AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर

चालता येईना… जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर

| Updated on: Sep 02, 2026 | 6:59 PM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वात चालबाज माणूस संबोधत जोरदार टीका केली. सरकारच्या वेळकाढूपणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत १२ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. आंदोलक आक्रमक झाले असून मराठवाड्यात रास्ता रोको करण्यात आला.

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. जालनाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी तपासणी केली असली तरी, जरांगेंनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली, त्यांना सर्वात चालबाज माणूस असे संबोधले.

जरांगे पाटलांनी सरकारला दोन दिवसांचीही मुदत वाढवून देणार नसल्याचे स्पष्ट केले. १७ संस्था आणि नकोलापूर संस्थांच्या जीआरची त्यांची मुख्य मागणी आहे. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची मागणी ते गेल्या वर्षापासून करत असल्याचे त्यांनी सांगितले. १२ सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत असून, धारशिव औसा रोडवर आणि धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको करत आपला पाठिंबा दर्शवला. न्यायामूर्ती शिंदे समिती मराठवाडा विभागाचा दौरा करणार असल्याची माहिती विखे पाटलांनी दिली असली तरी, जरांगेंनी सरकारवर वेळकाढूपणाचा आरोप केला.

Published on: Sep 02, 2026 06:59 PM

Follow Us