Chanakya Neeti : प्रत्येक स्त्रीला आपल्या जोडीदाराकडून हवी असते ‘ही’ एकच गोष्ट, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीतीतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी आदर्श पुरुषाची लक्षणं सांगितली आहेत.

Chanakya Neeti : प्रत्येक स्त्रीला आपल्या जोडीदाराकडून हवी असते ही एकच गोष्ट, चाणक्य काय सांगतात?
| Updated on: May 10, 2025 | 11:17 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयांवर चर्चा केली आहे, हा ग्रंथ आजही अनेकांना आपला जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामध्ये आयुष्य जगत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? काय करावं काय करू नये? आदर्श पत्नी कशी असावी? आदर्श पत्नीची लक्षण काय आहेत? आदर्श पती कसा असावा, कुटुंप्रमुखांनी काय काळजी घ्यावी, संपत्ती कुठ खर्च करावी? कुठे खर्च करू नये? कोणाला मदत करावी? राजा कसा असावा? त्याचा प्रजेसोबत व्यवहार कसा असावा? अशा एकना अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती ग्रंथामध्ये सुखी संसाराचं सूत्र सांगितलं आहे. ते म्हणतात कोणत्याही स्त्रीची आपल्या जोडीदाराकडून किंवा पतीकडून फार काही अपेक्षा नसते फक्त तो प्रामाणिक असावा, स्वाभिमानी असावा एवढीच तीची इच्छा असते, जर तिचा पती ही इच्छा पूर्ण करत असेल तर त्यांचा संसार सुखाचा होतो.

चाणक्य काय म्हणतात? 

चाणक्य म्हणतात कोणतीही स्त्री आपल्या जोडीदाराची निवड ही त्याचा प्रमाणाणिकपणा पाहूनच करते, तसेच पत्नीला देखील आपल्या जोडीदाराकडून प्रामाणिकपणाचीच अपेक्षा असते. तसेच तो स्वाभीमानी असावा, त्याने स्वत:च्या कमाईतून आपला आणि आपल्या मुलाबाळांचा सांभाळ करावा असं तिला वाटत असंत. तुम्ही जर तुमच्या जोडीदाराच्या या दोन इच्छा पूर्ण केल्या तर तुमचा संसार सुखाचा होतो असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खोट बोलत असाल तर ते देखील तिला कधीच आवडणार नाही, त्यामुळे आपली फसवणूक झाली अशी तिची भावना होऊ शकते असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)