Chanakya Niti : ज्या माणसाकडे या चार गोष्टी तोच खरा श्रीमंत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात माणसाकडे नुसता पैसा असून देखील उपयोग नाही तर काही गुणांची देखील आवश्यकता असते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : ज्या माणसाकडे या चार गोष्टी तोच खरा श्रीमंत, चाणक्य काय म्हणतात?
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 7:34 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात अनेकांना आपल्या जीवनात मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात पैसा ही एक अशी गोष्ट आहे, जी जगण्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर तुम्हाला समाजात मान-सन्मान देखील मिळणार नाही. मात्र जर तुमच्याकडे पैसा असेल तर हाच समाज तुम्हाला डोक्यावर घेईल. त्यामुळे प्रत्येकाने पैशांची बचत ही केलीच पाहिजे. जर तुम्ही महिन्याला शंभर रुपये कमवत असाल तर त्यातील 25 रुपयांची बचत तर तुम्ही केलीच पाहिजे.

परंतु तुमच्याकडे पैसा आहे, म्हणजेच सर्व काही आहे, असाही याचा अर्थ होत नाही. तर तुमच्याकडे पैशांसोबतच काही गुण असणं देखील आवश्यक आहे. जर हे गुण तुमच्याकडे नसतील तर तुमच्याकडे असलेल्या पैशांना शून्य किंमत उरते. जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते, तेव्हा तुमच्याजवळ असलेला पैसा तर तुमच्या मदतीला येतोच. परंतु काही वेळा अशी परिस्थिती निर्माण होते, की त्यावेळी तुम्हाला पैशांची नाही तर माणसांची आवश्यकता असते. त्यामुळे आपण नेहमी समाजाच्या देखील संपर्कात राहिलं पाहिजे, असं चाणक्य म्हणतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Loading...

ज्ञान- चाणक्य म्हणतात तुमच्याकडे नुसता पैसाच असून उपयोग नाही, जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर लोकं तुमच्याकडचा सर्व पैसा तुमची फसवणूक करून घेऊन टाकतील. जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी त्याचा काहीही उपयोग नाही, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मान सन्मान – चाणक्य म्हणतात पैसा तर सर्वांकडेच असतो, मात्र फार थोड्या लोकांना समाजात मान -सन्मान मिळतो. ज्यांना मान -सन्मान मिळतो तोच खरा श्रीमंत.

संस्कार – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे जर पैसा असेल, परंतु तुमच्यावर योग्य संस्कार झाले नसतील तर मात्र तुम्ही गरीबच आहात, तोच खरा श्रीमंत व्यक्ती असतो, ज्याच्याकडे पैशांसोबतच संस्कार देखील असतात.

दातृत्व – चाणक्य म्हणतात पैसा तर सगळ्यांकडेच असतो, परंतु गरजू लोकांना मदत करण्याची वृत्ती देखील तुमच्यामध्ये असली पाहिजे. गरजू व्यक्तींना मदत केली पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us