Chanakya Niti : चाणक्यांच्या या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, आयुष्यच बदलू जाईल

आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. आज आपण चाणक्य यांचे असेच काही प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत.

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा, आयुष्यच बदलू जाईल
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 09, 2026 | 9:59 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. माणसानं आपल्या आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणूस त्याच्या आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्यामुळे भविष्यात त्याचं फार मोठं नुकसान होणार असतं, त्याच्यावर पश्चातापाची वेळ येणार असते. या अशा चुका असतात त्या जर तुम्ही एकदा केल्या तर त्यातून तुम्हाला कधीही बाहेर पडता येत नाही. तुमचा पाय अधिकच अडकत जातो. त्यामुळे माणसाने कोणतीही कृती ही खूप विचारपूर्वकच केली पाहिजे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

खरा मित्र – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही अडचणीत असता, म्हणजे आजारपण, अचानक आलेलं एखादं मोठं संकट किंवा इतर कोणतंही मोठं संकट असू द्या, अशा काळात जो तुमच्यासोबत उभा राहतो, तोच तुमचा खरा मित्र असतो. अशा मित्रांची साथ तुम्ही आयुष्यभर सोडता कामा नये. त्याच्याही संकटाच्या काळात तुम्ही त्याला मदत केली पाहिजे, लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात असलेले असे लोक जेव्हा तुम्ही गमावता तेव्हा तुमची ती फार मोठी चुक असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

शिक्षण – चाणक्य म्हणतात पैसा आज आहे, उद्या नाही. पण जर तुमच्याकडे शिक्षण असेल तर तुम्ही त्याचा वापर करून आयुष्यात भरपूर पैसा कमवू शकता. जर तुम्ही सुशिक्षित असाल तर समाजामध्ये तुम्हाला मान असतो. त्यामुळे आयुष्यात कधीही अशिक्षित राहण्याची चूक करू नका, नेहमी नव्या गोष्टी शिकत राहा, त्यातच तुमचं भलं आहे.

दोन तोंडी लोक – चाणक्य म्हणतात समाजात अशी काही लोक असतात जे एकाला एक बोलतात दुसऱ्याला दुसरं बोलतात. ते कधीही आपल्या मतांवर ठाम नसतात, अशा लोकांसोबत कधीही आयुष्यात मैत्री करू नका, कारण जर तुम्ही अशा लोकांसोबत मैत्री केली तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात.

मोह – चाणक्य म्हणतात एखाद्या गोष्टीचा मोह होणं हा माणसाचा स्वभावच आहे. मात्र हाच मोह तुम्हाला अडचणीत आणू शकतो, त्यामुळे कधीही एखाद्या गोष्टीचा अत्याधिक मोह ठेवू नका.

मदत – चाणक्य म्हणतात माणसानं नेहमी इतरांना मदत केली पाहिजे, तुम्ही जर आज इतरांना मदत केली, तर भविष्यात लोक देखील तुम्हाला मदत करतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us