
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते विचार आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. माणसानं आपलं आयुष्य कसं जगावं? येणाऱ्या संकटांचा सामना कसा करावा? तसेच आपल्यावर जर एखादं संकट येणार असेल तर त्याची चाहुल कशी ओळखावी? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात कोणतंही संकट असं अचानक येत नसतं, तर ते संकट येण्यापूर्वी काही संकेत देत असतं, हे संकेत जर आपल्याला ओळखता आले तर माणूस या संकटातून बाहेर पडू शकतो, किंवा संकट येण्यापूर्वीच काही उपाय करता येतात. चला तर मग जाणून घेऊयात हे संकेत नेमके कोणते आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
चाणक्य म्हणतात कधी-कधी तुमच्या आयुष्यात अशी वेळ येते की तुम्ही खूप कष्ट करता, पण तुम्हाला अपेक्षित फळ मिळत नाही. हा देखील एक मोठा संकेत असतो. जेव्हा तुम्हाला खूप कष्ट करून देखील फळ मिळत नाही, तेव्हा तुम्ही अचानक तुमचा संयम गमावून बसता, त्यामुळे मोठ्या संकटाला आमंत्रण मिळतं. मात्र अशावेळी हे संकेत ओळखून माणसानं संयम ठेवावा. ही वेळ तुमची नाही, हे ओळखावं आणि योग्य वेळ येताच पुन्हा निर्णय घ्यावा, तर तुम्हाला नक्की यश मिळेलं.
स्वार्थी, फसवणूक करणारे लोक – चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या आयुष्यात स्वार्थी आणि विश्वासघात करणाऱ्या लोकांची गर्दी होऊ लागते, तेव्हा हा संकेत तुम्ही वेळीच ओळखा, हे तुमच्यावर येणाऱ्या भविष्यातील संकटाचे संकेत असतात. अशा लोकांपासून नेहमी सावध रहा. या लोकांना जेवढं शक्य होईल तेवढं दूर ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
गृह कलह- चाणक्य म्हणतात जेव्हा कोणतंही कारण नसताना तुमच्या घरात गृहकलह वाढतो, तेव्हा समजून जा की हे एका फार मोठ्या संकटाचे संकेत आहेत. तुम्ही जर वेळीच सावध झालात, आणि यातून बाहेर पडलात तर अशा संकटातून तुम्ही वाचू शकता.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)