
चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे, या ग्रंथामध्ये ते म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेकदा अशी परिस्थिती निर्माण होते, की त्याला अपमानित व्हाव लागतं, त्याच्यावर कठोर शब्दात टिका केली जाते, मात्र जेव्हा-जेव्हा तुमच्यावर अशी परिस्थिती येते, तेव्हा घाबरून जाऊ नका. जेव्हा एखाद्या ठिकाणी तुमचा अपमान होते, तेव्हा तुम्हाला समरोच्या व्यक्तीचा राग येण ही एक साहजिक गोष्ट आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये जो व्यक्ती आपलं डोकं थंड ठेवतो तोच भविष्यात एक यशस्वी व्यक्ती होतो. त्यामुळे जर एखाद्यानं आपला अपमान केला असेल तर त्याला कधीही रागात उत्तर देऊ नका, तर तुमच्या कर्तृत्वामधून आणि यशामधून त्याला उत्तर द्या, तुम्ही जेव्हा यशस्वी होता, तेव्हा ती गोष्ट ज्याने तुमचा अपमान केला आहे, त्या व्यक्तीच्या कायम लक्षात राहते असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही पुढे जात असता, प्रगती करत असता तेव्हा अनेकांना तुमची प्रगती पहावत नाही, ते तुम्हाला मागे ओढण्यासाठी अनेकदा कट कारस्थानं रचतात. संधी मिळेल तेव्हा ते तुम्हाला अपमानीत करतात, हेच ते लक्षण आहे की तुम्ही पुढे जात आहात, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कधीही घाबरू नका, तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, पुढे चलत राहा आणि तुमच्या प्रगतीमधून अशा लोकांना उत्तर द्या, त्यानंतर हे लोक कधीही तुमचा अपमान करण्याचा किंवा तुम्हाला मागे ओढळण्याचा प्रयत्न करणार नाही असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
चाणक्य यांच्या मते जे व्यक्ती अशा पद्धतीने तुमचा अपमान करत असतात, कारण नसताना तुमच्यावर टीका करत असतात ते लोक आतून खूप कमजोर असतात. त्यामुळे रागाच्या भरात कधीही अशा व्यक्तींना उत्तर देऊ नका, शांत डोक्यानं पुढे चालत रागा आणि तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा या लोकांना आपोआपच उत्तर मिळत असतं. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायच असेल तर सर्व प्रथम दोन गोष्टी करा एक म्हणजे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, ज्या व्यक्तीचं आपल्या रागावर नियंत्रण असतं तो व्यक्ती आयुष्यात मोठं यश प्राप्त करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात संयम ठेवा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)