Chanakya Niti : घरात जर या गोष्टी सतत घडत असतील तर समजून जा असं घर लवकरच उद्ध्वस्त होणार आहे, चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्य चाणक्य म्हणतात जेव्हा घरातील सदस्यांना एकमेकांबद्दल प्रेम, अपुलकी, जिव्हाळा असतो, तेव्हा असं घर दीर्घ काळ टिकत परंतु जेव्हा याउलट परिस्थिती असते, तेव्हा ते घर उद्ध्वस्त होतं, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : घरात जर या गोष्टी सतत घडत असतील तर समजून जा असं घर लवकरच उद्ध्वस्त होणार आहे, चाणक्य काय सांगतात?
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 22, 2026 | 10:05 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनितीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. कुटुंब कसं असावं? कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांसोबतचे संबंध कसे असावेत? पती-पत्नीचं नातं कसं असावं? आई -वडील आणि मुलांचं नातं कसं असावं? घरातील कुटुंबप्रमुखाच्या जबाबदाऱ्या काय आहेत? अशा अनेक विषयांवर चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये लिखाण केलं आहे. चाणक्य यांच्या चाणक्य नीतीमध्ये एकूण श्लोकांची संख्या 6 हजार इतकी आहे. दरम्यान चाणक्य म्हणतात जेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीबद्दल जिव्हाळा, अपुलकी आणि प्रेम असतं, तेव्हा ते कुटुंब दीर्घकाळ टिकतं, परंतु जेव्हा कुटुंबातील व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल दोष, मत्सर निर्माण होते, तेव्हा असं कुटुंब फार काळ टिकून शकत नाही, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

सतत भांडणं – चाणक्य म्हणतात ज्या घरात सतत भांडणं होतात, घर कायम अशांत असतं, जिथे कुटुंबातीलच सदस्य एकमेकांविरोधात कट रचतात, असं घर फार काळ टिकत नाही. असं घर उद्ध्वस्त होतं. त्यामुळे नेहमी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींबद्दल मनात आदर ठेवला पाहिजे, अपुलकी आणि प्रेमाची भावना असली पाहिजे, तर ते घर दीर्घकाळ टिकतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

पती-पत्नीमध्ये प्रेम – चाणक्य म्हणतात ज्या घरात पती-पत्नीमध्ये प्रेम नसतं, सारखी भांडणं होतात अशा घराला उद्ध्वस्त व्हायला जास्त वेळ लागत नाही. कारण पती-पत्नी ही एकाच रथाची दोन चाकं आहेत, जोपर्यंत ही चाकं समान गतीने आणि समान दिशेनं धावतात तोपर्यंत हा संसाररूपी रथ अधिक वेगाने धावत राहतो. परंतु जेव्हा ही दोन्ही चाक एकमेकांची साथ सोडतात, तेव्हा संसार उद्ध्वस्त होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मोठ्यांचा आदर – चाणक्य म्हणतात ज्या घरात मोठ्या व्यक्तींना आदर दिला जात नाही, त्यांचा अपमान केला जातो, ते घर फार काळ टिकत नाही, असं घर लवकरच उद्ध्वस्त होतं. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले लोक अनुभवाने देखील मोठे असतात, त्यामुळे त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us