Chanakya Niti : फक्त या सवयी बदला; नशीबही बदलेल, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबू शकणार नाही
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात माणसाला अशा काही सवयी असतात, ज्या त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा ठरतात. या सवयी लगेच बदलल्या पाहिजेत चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या की आजच्या काळात देखील मार्गदर्शनाचं काम करतात. चाणक्य म्हणतात मानसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर त्याला असलेल्या चुकीच्या सवयी, काही माणसांना चुकीच्या सवयी असतात, आणि याच सवयी भविष्यात त्या व्यक्तीच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा ठरतात. अशाही काही सवयी असतात, ज्या आपण तरूणपणात करतो, परंतु त्याची किंमत ही आपल्याला आपल्या म्हतारपणात चुकावी लागते. त्यामुळे अशा सवयींचा त्याग करणं यातच आपलं हीत आहे. जर तुम्ही या सवयींचा त्याग केला तर आयुष्यात तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणतीही थांबवू शकणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशा या नेमक्या कोणत्या सवयी आहेत? त्याबद्दल.
पैशांची उधळपट्टी – अनेकांना पैशांची उधळपट्टी करण्याची सवय असते, अनेक लोक काहीही कारण नसताना पैसे खर्च करतात. लोकांना मोठेपणा दाखवण्याच्या नादात ज्या गोष्टींची गरज नाही, ती गोष्ट देखील खरेदी करतात. त्यामुळे अशा लोकांच्या हातात पैसा टिकत नाही, पैशांची बचत होत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही कमवता तोपर्यंत तुमच्या हातात पैसा असतो. परंतु जेव्हा तुम्ही म्हातारे होतात, तेव्हा तुमच्याकडे पैसा राहत नाही, त्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे पैशांची उधळपट्टी टाळली पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
प्रामाणिकपणा – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात खरच श्रीमंत व्हायचं आहे, तर प्रामाणिकपणे कष्ट केल्याशिवाय तुमच्याकडे इतर दुसरा कोणताही पर्याय नाहीये, तुम्ही एखाद्या व्यक्तीची फसवणूक करून थोड्यावेळासाठी श्रीमंत देखील व्हाल परंतु असा पैसा जास्त काळ तुमच्या हातात टिकत नाही. हा पैसा लगेच खर्च होतो. त्यामुळे तुम्ही जे देखील कमवाल ते प्रामाणिकपणे आणि कष्ट करून कमवा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
संधी गमावू नका – चाणक्य म्हणतात प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात एक न एक दिवस चांगली संधी मिळत असते, ही संधी तुम्हाला ओळखता आली पाहिजे, अशी संधी कधीही गमावू नका, तुम्ही जर ही संधी गमावली तर तुमचं तुमच्या आयुष्यात प्रचंड नुकसान होईल, परंतु तुम्ही जर ही संधी साधली तर आयुष्यात तुमचं कल्याण होईल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.