Chanakya Niti : या लोकांना आयुष्यात कधीच दुसरी संधी देऊ नका, येईल पश्चातापाची वेळ

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात, आपल्या आयुष्यात अशी काही लोकं असतात, ज्यांना एक संधी पुरेशी असते, जर तुम्ही त्यांना दुसरी संधी दिली तर तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते.

Chanakya Niti : या लोकांना आयुष्यात कधीच दुसरी संधी देऊ नका, येईल पश्चातापाची वेळ
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 8:32 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मानवाला आजच्या काळात देखील विचार करायला भाग पाडतात. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात अनेक लोकं येत असतात, प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो. समजात जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. परंतु आपल्या आयुष्यात असे देखील काही लोकं येतात, ज्यांना तुम्ही एकदाच संधी दिली पाहिजे, अशा लोकांना वारंवार संधी देणं हे तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे योग्य खबरदारी घेतली पाहिजे, अशा लोकांना फक्त एकदाच संधी द्यावी, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात, चाणक्य यांनी नेमकं अशा व्यक्तींबद्दल चाणक्य नीती या आपल्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

विश्वासघातकी मित्र – चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही लोक असतातच ज्यांच्यावर तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांपेक्षाही अधिक विश्वास ठेवता. परंतु असे लोक कधी कधी तुम्हाला धोका देतात. जर अशा मित्रांनी तुम्हाला धोका दिला, ज्याला तुम्ही खूप विश्वासू समजत होता, तर अशा मित्रावर पुन्हा आयुष्यात कधीच विश्वास ठेवू नका. अशा लोकांना आयुष्यात कधीच पुन्हा दुसरी संधी देऊ नका. जर तुम्ही अशा विश्वासघातकी लोकाला दुसरी संधी दिली तर ते तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Loading...

पुन्हा पुन्हा तीच चूक करणारे लोकं – चाणक्य म्हणतात जेव्हा एखादा माणूस एखादी चूक करतो, तेव्हा आधी त्याचा हेतू तपासा जर त्याने ती चूक जाणून बुजून केली नसेल, ती चूक करण्यामागे त्याचा उद्देश चुकीचा किंवा वाईट नसेल तर अशा माणसाला दुसरी संधी ही निश्चितच मिळायला हवी, परंतु जर एखादा वक्ती वाईट उद्देशाने जाणून बुजून पुन्हा पुन्हा एकच चूक करत असेल तर अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही दुसरी संधी देऊ नका, कारण यामुळे तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कपटी लोक – चाणक्य म्हणतात ज्यांच्या मनात कपट आहे, अशा लोकांना देखील कधीही दुसरी संधी मिळता कामा नये.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us