Chanakya Niti : माणसाने अशा ठिकाणी कधीच थांबू नये, संकटांना द्याल निमंत्रण
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात की अशी काही ठिकाणं असतात, जिथे माणसाने कधीही थांबता कामा नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते. त्यांनी आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी बलाढ्य अशा राजा धनानंदाचा पराभव केला. धनानंद याच्या पराभवानंतर त्यांनी चद्रगुप्त मौर्य यांना राजा बनवलं. यासाठी चाणक्य यांनी आपल्या बुद्धीचा आणि कुटनीतीचा वापर केला, अशी अख्यायिका आहे. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी त्यांना जे अनुभव आले, त्या अनुभवाचं कथन केलं आहे. चाणक्य म्हणतात या जगात अशी काही ठिकाणं असतात, जिथे माणसाने कधीही थांबू नये, तुम्ही अशा ठिकाणी खूप थोडा काळ देखील थांबलात तरी देखील तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
दोन व्यक्तीची भांडणं – चाणक्य म्हणतात जिथे दोन व्यक्तींचे भांडणं सुरू आहेत, अशा ठिकाणी कधीही थांबू नये, तिसऱ्या व्यक्तीने दोन व्यक्तीच्या भांडणामध्ये कधीही पडण्याचा प्रयत्न करू नये, असे केल्यास तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तसेच तुम्ही या भांडणामध्ये कोणत्याही एका व्यक्तीची बाजू घेतली तर दुसऱ्या व्यक्तीसोबत तुमचं वैर निर्माण होण्याचा धोका असतो, त्यामुळे अशा ठिकाणी कधीही थांबू नये. तसेच अशा ठिकाणचं वातावरण कधीही बदलू शकतं, त्यामुळे तुमचा जीव देखील संकटात येऊ शकतो, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जुगार – चाणक्य म्हणतात जिथे जुगार खेळला जातो, अशा ठिकाणी देखील कधीही थांबता कामा नये, कारण अशा ठिकाणी तुम्ही नुसतं थांबला जरी तरी देखील तुमचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. कारण जुगार ही अशी एक गोष्ट आहे, जिचा नाद तुम्हाला कधी लागेल हे कळणार देखील नाही. त्यामुळे कधीही अशा ठिकाणी थांबता कामा नये, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)