
चाणक्य हे एक कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी राज्यकारभार कसा असावा? आणि राजानं काय काळजी घ्यावी? याबद्दल आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. मात्र त्याचसोबत चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ देखील होते. पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कुठे खर्च करू नये? पैशांची बचत कशी करावी? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अनेकदा परिस्थिती अशी येते की माणूस अडचणीत सापडतो. त्याची आर्थिक परिस्थिती खालावते, कर्ज घेतल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नसतो, मात्र अशी परिस्थिती आल्यानंतर कर्ज घेताना काय काळजी घ्यावी? कोणाकडून कर्ज घ्यावं? तसेच तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कर्ज देणार असाल तर ते देताना काय काळजी घ्यावी? म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही, याबद्दल देखील चाणक्य यांनी काही गोष्टी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहेत.
कर्ज घेताना काय काळजी घ्यावी? – चाणक्य म्हणतात माणसानं शक्यतो कर्ज घेऊच नये, मात्र जर तुमच्यावर कर्ज घेण्याची वेळ आलीच तर सर्वात आधी तुम्हाला किती पैशांची गरज आहे, ते एकदा ठरवा, त्यापेक्षा अधिक एकही रुपयाचं अधिक कर्ज घेऊ नका, तसेच तुम्ही ज्या कामासाठी कर्ज काढले आहेत, ते पैसे त्याच कामासाठी वापरा, कर्ज काढलेल्या पैशांची उधळपट्टी करू नका, अन्यथा तुम्ही संकटात याल, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चाणक्य पुढे असेही म्हणतात की तुम्ही ज्या व्यक्तीकडून कर्ज घेणार असाल तर सर्वात आधी तो किती विश्वासू आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, तो तुमची फसवणूक करणार नाहीना हे देखील तपासा.तसेच तुमची कर्ज फेडण्याची क्षमता किती आहे, त्यावरच कर्ज किती घ्यायचं ते ठरवा, असा सल्ला चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
कर्ज देताना काय काळजी घ्यावी- चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्ज देणार असाल तेव्हा त्या माणसाची कर्ज फेडण्याची किती क्षमता आहे, तो तुमची फसवणूक तर करणार नाही ना? या गोष्टी लक्षात घ्या, तसेच तुमच्यापेक्षा अधिक बलवान असलेल्या किंवा अप्रामाणिक मानसांना कधीही कर्ज देण्याची चूक करू नका, कारण त्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)