Chanakya Niti | सुखी वैवाहिक आयुष्य हवंय?, मग चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 6 गोष्टींचे पालन नक्की करा

| Updated on: Dec 29, 2021 | 8:15 AM

आजच्या काळात ती सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये वैवाहिक जीवन खराब करण्यासाठी जबाबदार मानल्या जातात.

Chanakya Niti | सुखी वैवाहिक आयुष्य हवंय?, मग चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 6 गोष्टींचे पालन नक्की करा
chankaya Niti
Follow us on

मुबंई : भारतात विवाहसंस्था या गोष्टीला खूप महत्त्वप्राप्त आहे. लग्न या गोष्टींमध्ये फक्त दोन व्यक्तींच नाही तर संपूर्ण कुंटुंबाचा समावेश असतो. पूर्वीच्या काळी लग्नानंतर आयुष्यभर नाते जपले जायचे. पण सध्या घटस्फोटाची प्रकरणे सर्रास पाहायला मिळतात. एका अभ्यासावरुन पती-पत्नी दोघांमध्ये संयम, आदर, सन्मान या गोष्टींची काळजी घेतली जात नाही म्हणून घटस्फोटांच्या प्रकरांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

आजच्या काळात ती सहनशीलता लोकांकडे उरलेली नाही. आधुनिक जीवनात राग, चिडचिड, खर्च, तणाव आणि खोटे बोलण्याची प्रवृत्ती लोकांच्या स्वभावात वाढीस लागली आहे. असे ही निर्दशनास आले आहे. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये वैवाहिक जीवन खराब करण्यासाठी जबाबदार मानल्या जातात. या सवयी वेळीच हातावेगळ्या करा. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी .

राग

रागामुळे माणसाचे सर्वात जास्त नुकसान होते. जर पती-पत्नीपैकी कोणीही रागीट स्वभावाचे असेल तर जीवनात कधीही शांती येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत संघर्षाची परिस्थिती निर्माण होते आणि वैवाहिक जीवन कमकुवत होते. अशा स्थितीत तुमच्या रागावर संयम ठेवावा.

गुपित

जर तुम्हाला तुमचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर तुमची गुपिते स्वतःकडेच ठेवणे चांगले. जर तुमच्या गोष्टींमध्ये तुम्ही तिसरी व्यक्ती ठेवली तर तुमच्यातील समस्या सोडवण्याऐवजी समस्या अजूनच कठीण होऊन बसेल.

खोटे बोलणे

पती-पत्नीचे नाते फार नाजूक असते. यामध्ये खोट्याचा अवलंब करू नये. कालांतराने तुमचे सत्य बाहेर आले तर जोडीदाराचा विश्वास संपुष्टात येईल आणि तुमच्या नात्यात कटुता येऊ लागेल. तुमच्या नात्यामध्ये परदर्शकता आणण्याचा प्रयत्न करा.

खर्च

उत्पन्नानुसार पती-पत्नी दोघांनीही खर्चाचा समतोल राखला पाहिजे. तुमच्या खर्चाचा हिशेब नसला तरी पती-पत्नीमध्ये संघर्षाची परिस्थिती नक्कीच निर्माण होईल.

मर्यादा

प्रत्येक नात्याला मर्यादा असते. हे पती-पत्नी दोघांनीही लक्षात ठेवावे. मर्यादा ओलांडली की नातीही तुटण्याच्या मार्गावर येतात.

सहनशक्ती

आयुष्यात अनेक वेळा अशा संकटांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत पती-पत्नी दोघांनीही एकमेकांचा आधार बनला पाहिजे आणि परिस्थितीला संयमाने सामोरे गेले पाहिजे.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Zodiac| ‘ठरवलं की करणारच’, चिकाटी हीच ओळख, या 4 राशींची मनं जिंकणं जगातलं सगळ्यात अवघड काम!

Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!

Zodiac | ‘सुख म्हणजे नक्की हेच असतं’ असं म्हणाल, फक्त दोन दिवस थांबा, या 5 राशींचे नशीब बदलणार