Marathi News » Rashi bhavishya » These zodiac signs can get their favorite partner in the new year 2022 know about your marital status know more about this
Zodiac 2022 | नवीन वर्षात या 5 राशींच्या लोकांचे दोनाचे चार हात होणार, या वर्षी लग्न नक्की!
नवीन वर्षापासून अनेकांना नव्या आशा आहेत. सध्या ज्या प्रकारे लग्न होत आहेत तुमच्या पैकी प्रत्येकाला आपला नंबर कधी लागणार असेच वाटत असेल. 2022 हे वर्ष या राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. या वर्षात राशीचक्रातील 5 राशींचे लग्न जमण्याचे संकेत आहेत.
मेष राशीच्या लोकांसाठी 2022 हे वर्ष खूप भाग्यशाली ठरू शकते. तुम्ही अविवाहित असाल तर येत्या वर्षभरात तुमचा शोध पूर्ण होऊ शकतो. नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येईल.
1 / 5
वृषभ राशीचे अविवाहित असलेल्या लोकांना आता लग्नाची वाट पाहावी लागणार नाही. पुढच्या वर्षी तुमचे लग्न निश्चित होण्याची अपेक्षा आहे . लग्न जुळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
2 / 5
धनु राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष खूप चांगले राहील. ज्या जोडप्यांचे वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत, ते सर्व दूर होतील. जे विवाहित आहेत, त्यांचे वैवाहिक जीवन खूप आनंददायी असेल.
3 / 5
कुंभ राशीच्या व्यक्ती जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर संबंध चांगले राहतील आणि लग्नाचे नियोजन करता येईल. जर तुम्हाला अरेंज मॅरेज हवे असेल तर ते वर्षाच्या अखेरीस शक्य होऊ शकते.
4 / 5
मकर राशीच्या व्यक्तींची लग्नाची प्रतीक्षा आता संपेल. मे 2022 ते जुलै 2022 दरम्यान विवाहाचे योग येऊ शकतात. तुम्हाला तुमचा आवडता जोडीदार मिळेल अशी आशा आपण करू शकतो. सर्व अडथळे दूर होतील. विवाहित जोडप्यांसाठी नवीन वर्ष चांगले राहील.