Chanakya Niti : चाणक्यांचे हे विचार तुमचं अख्ख आयुष्यच बदलून टाकतील, जीवनात यशस्वी व्हाल

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ होते तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ते आजही तेवढेच महत्त्वाचे आणि उपयोगी ठरतात. चाणक्य यांच्या या विचारांनी आजही अनेकांना प्रेरणा मिळते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : चाणक्यांचे हे विचार तुमचं अख्ख आयुष्यच बदलून टाकतील, जीवनात यशस्वी व्हाल
chankya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 10, 2026 | 8:49 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये जे विचार मांडले आहेत, ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजच्या काळात देखील अनेकांसाठी मार्गदर्शक ठरतात. माणसाने आपल्या आयुष्यात काय करावं? काय करू नये? आयुष्य कसं जगावं? संकट काळत काय करावं? काय करू नये याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. सम्राट धनानंदाने चाणक्य यांचा अपमान केला होता. चाणक्य यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर राजा धनानंद याची सत्ता उलथून चंद्रगुप्त यांना राजा केलं आणि आपल्या अपमानाचा बदला घेतला. चाणक्य म्हणतात माणसाकडे चार महत्त्वाच्या गोष्टी असायलाच हव्यात, जर माणसाला या चार सवयी असतील तर त्याचा कधीच पराभव होऊ शकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिस्त – चाणक्य म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये शिस्त ही असलीच पाहिजे. जर तुमच्याकडे शिस्त नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच कोणती गोष्ट मिळू शकणार नाहीत. यश तर खूप दूरची गोष्ट राहिली. शिस्त ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला तुमची कामं वेळेत करण्याची प्रेरणा देते. तसेच जर तुमच्याकडे शिस्त असेल तर आयुष्याकडे एका नव्या नजरेनं बघण्याचा दृष्टीकोण तुम्हाला प्राप्त होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिस्त नावाची गोष्ट असायलाच हवी असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कष्ट – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर मग कष्टाला पर्याय नाही. कष्टाशिवाय तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीही यश मिळू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात तुम्हाला कोणतीही वस्तू फुकट मिळत नाही, त्यासाठी तुम्हाला तिची किंमत मोजावीच लागते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे माणसाने आळस झटकून नेहमी काम करण्याची कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.

संयम – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संयम फार महत्त्वाचा असतो. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं की लगेचच अनेक जण प्रयत्न करणं सोडून देतात. तुम्हाला अपयश आलं हा तुमचा पराभव नसतो, तर खरा पराभव तेव्हा होतो, जेव्हा तुम्ही अपयशानंतर प्रयत्न करंण सोडू देतात. त्यामुळे माणसाकडे नेहमी संयम असला पाहिजे, अपयशातून योग्य तो धडा घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केली पाहिजे. एक दिवस यश तुम्हाला नक्की मिळणार असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

वेळेचा उपयोग – चाणक्य म्हणतात वेळ कोणासाठीही थांबत नाही. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे माणसाने नेहमी आपली सर्व कामे वेळेतच पूर्ण केली पाहिजेत, असं चाणक्य म्हणतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us