Chanakya Niti : मित्र बनवताना या गोष्टींचा हजारदा विचार करा, अन्यथा होईल पश्चाताप, चाणक्य मैत्रीबद्दल काय सांगतात?
आर्य चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात या जगात मैत्री इतकं दुसरं सुंदर कोणतंही नातं नाही. परंतु कोणालाही मित्र बनवण्यापूर्वी काही गोष्टी या अशा असतात ज्यांचा तुम्हाला विचार करावाच लागतो, अन्यथा तुमच्यावर पश्चातापाची वेळ येऊ शकते, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीति नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की या जगात मैत्री इतकं दुसरं प्रेमळ नातं कोणतंच नाही. जेव्हा -जेव्हा तुमच्यावर संकट येतील तेव्हा कदाचित तुमचे नातेवाईक देखील तुमच्यासोबत नसतील परंतु एक खरा मित्र नेहमी तुमच्यासोबत असतो. तो तुमची नेहमी मदत करतो, परंतु कधी कधी परिस्थिती अशी देखील येते की तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला, तोच मित्र तुमचा विश्वासघात देखील करू शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करताना काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. त्यानंतरच तुम्ही संबंधित व्यक्तीसोबत मैत्री करायची आहे की? नाही याचा निर्णय घेतला पाहिजे. नेहमी तुमच्यासोबत गोड बोलणारे, तुमच्या चुकीच्या कामात देखील तुमची साथ देणारे कधीच तुमचे खरे मित्र होऊ शकत नाहीत. उलट तुम्ही चुकत असाल तर तुमच्या तोंडावर सांगण्याची जे हिंमत करतात, तेच तुमचे खरे मित्र असतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं मैत्रीबद्दल काय म्हटल आहे? त्याबद्दल.
समान दर्जा – चाणक्य म्हणतात जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री कराल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही नेहमी तुमच्या बरोबरीची असावी, म्हणजे तो तुमच्यापेक्षा फार श्रीमंत देखील नसावा आणि गरीब देखील नसावा. कारण आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत किंवा गरीब व्यक्तीसोबतची मैत्री कधीही फार काळ टिकत नाही, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
विचार – चाणक्य म्हणतात मैत्रीचं मुळ हे विचारांमधूनच उगवतं जर एखाद्या व्यक्तीचे विचार तुमच्या विचारांशी मिळते -जुळते असतील तर अशी मैत्री फार काळ टिकते, परंतु जर तुम्ही विरोधी विचाराचे असाल तर अशी मैत्री फार काळ टिकेलच हे कोणीही सांगू शकत नाही.
स्वार्थ नसावा – चाणक्य म्हणतात मैत्रीमध्ये कधीही स्वार्थ नसावा, ज्या दिवशी मैत्रीमध्ये स्वार्थ येईल त्या दिवशी मैत्रीमध्ये दुरावा निर्माण होण्यास सुरुवात होते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)