Chanakya Niti : हा आहे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा दुर्गुण, चाणक्य म्हणतात आयुष्याचं वाटोळं होतं
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये माणसाचं समाजात वावरताना वर्तन कसं असावं? याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात, जो व्यक्ती आपल्यामधील दुर्गुण ओळखून वेळीच त्यांचा त्याग करतो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात यशस्वी होतो.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगलं पाहिजे? याबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच समाजात वावरताना माणसाचं वर्तन कसं असलं पाहिजे, याबद्दल देखील मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्यामधील दुर्गुण शोधता आले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही त्या दुर्गुणांचा त्याग केला पाहिजे, तर आणि तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात. चाणक्य पुढे असंही म्हणतात की माणसाचं हे दुर्दैव आहे की त्याला आपल्यामधील दुर्गुण कधीच दिसत नाहीत, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर आरोप करतो तेव्हा एक बोट त्याच्याकडे असतं, मात्र चार बोटं ही आपल्याकडे असतात. त्यामुळे कोणालाही दोष देण्यापूर्वी माणसानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आपल्यामधील उणीवा शोधून त्या दूर केल्या पाहिजेत. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
सर्वात मोठा दुर्गुण कोणता? चाणक्य म्हणतात माणसाचा सर्वात मोठा दुर्गुण कोणता असेल तर तो म्हणजे मला सगळं माहिती आहे, मला कोणाची गरज नाही हा त्याच्या मनात निर्माण झालेला गैरसमज आहे. हा गैरसमज वेळीच दूर होणं गरजेच असतं. मला सगळं माहीत आहे, असा जेव्हा माणसाचा समज होतो, तेव्हा त्याच्या अंधपतनाला सुरुवात होते. त्याच्या प्रगतीला ब्रेक लागतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की त्याला सगळं माहीत आहे, तेव्हा असा व्यक्ती कधीच नवं ज्ञान आत्मसात करू शकत नाही. पुरेस ज्ञान नसल्यामुळे असा व्यक्ती जगाच्या स्पर्धेत मागे पडतो आणि कालंतराने बाद होतो. त्यामुळे मानसाने मला सगळं काही माहीत आहे, मी सर्वज्ञानी आहे, असा गैरसमज करून घेऊ नये असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. माणसाने नेहमी शिकण्याची भूमिका ठेवली पाहिजे, नेहमी नवीन ज्ञान आत्मसात केलं पाहिजे असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
खोट बोलणं – चाणक्य म्हणतात हा देखील माणसाचा मोठा दुर्गुण आहे. परिस्थिती कशीही असो, माणसाने नेहमी सत्यच बोललं पाहिजे. तुम्ही नेहमीच खोटं बोलत आहात, हे जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या लक्षात येत तेव्हा अशा परिस्थितीमध्ये लोकांचा तुमच्यावरील विश्वास कमी होण्यास सुरुवात होते, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)