
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहीला, चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये जे विचार सांगितले आहेत, ते विचार आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतात. अनेकांना आजही चाणक्य यांच्या विचारांपासून प्रेरणा मिळते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये आयुष्य जगत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत याचं सार सांगितलं आहे. राजा कसा असावा? आदर्श राजा कसा असावा? कोणत्या सवयी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात? कोणत्या सवयी माणसाला यशाच्या शिखरापर्यंत नेऊ शकतात असे एकना अनेक विचार आर्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितले आहेत.
आर्य चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात ज्यामुळे माणूस कधीच श्रीमंत होऊ शकत नाही, त्या सवयी नेहमी त्याच्या यशामध्ये अडथळा बनतात, त्यामुळे अशा सवयी आपण टाळल्या पाहिजेत. तरच आपल्याला यश मिळू शकतं. आपण हाती घेतलेलं प्रत्येक काम पूर्णत्वास जाऊ शकतं जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?
आर्य चाणक्य म्हणतात सर्वात आधी आळस टाळा, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो. कोणतंही काम उद्यावर ढकलू नका. तुम्ही जर कामामध्ये आळस केला तर तो तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर मेहनत करा मेहनतीला पर्याय नाही.
अंहकार – आर्य चाणक्य म्हणतात जस आळस हा माणसाचा शत्रू आहे, तसाच आळस देखील माणसाचा मोठा शत्रू आहे, जर तुमच्याकडे अंहकार असेल तर तुम्ही कधीही प्रगती करू शकणार नाहीत.
राग – आर्य चाणक्य म्हणतात राग ही अशी गोष्ट आहे, जी तुमचं फार मोठं नुकसान करू शकते. रागामुळे तुम्ही अनेकदा चुकीचे निर्णय घेतात, त्याचा फटका तुम्हाला भविष्यात बसतो, त्यामुळे तुम्ही जो काही निर्णय घेणार असाल तो शांततेत घ्या.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)