Surat | मृतांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्मशानभूमीत खच्चून गर्दी, शिवलिंगावर सोडले जातायत जीवंत खेकडे

मृतांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्मशानभूमीत अनोखी जत्रा आयोजित केली आहे, जीवंत खेकडे शिवलिंगावर चढले रोग नाहीसे होतात अशी मान्यता .

Surat | मृतांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी स्मशानभूमीत खच्चून गर्दी, शिवलिंगावर सोडले जातायत जीवंत खेकडे
crabs put on shivlinga in gujrat
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 9:36 AM

मुंबई (मृणाल पाटील) : या दुनियेत कधी काय होईल हे सांगता येत नाही. असच एक उदाहरण आपल्याला सुरतमध्ये (Surat) पाहायला मिळत आहे. सुरतमध्ये लोकांच्या श्रद्धेचा (Fathe) अनोखा नमुना समोर आला आहे. येथे लोक स्मशानभूमीत असलेल्या शिवलिंगाला जिवंत खेकडे अर्पण करताना दिसतात . इतकंच नाही तर मरण पावलेल्यांच्या उद्धारासाठी भक्तांच्या आवडीच्या वस्तूही येथे अर्पण केल्या जातात, अशी श्रद्धा आहे. भारतातील सर्वच भागांमध्ये आपल्या मधून गेलेल्या आपल्या पितरांच्या ईच्छा पुर्ण करण्याची प्रथा आहे. पण शिवलिंगाला जिवंत खेकडे (crabs) हा प्रकार खूपच वेगळा आहे. आपल्याकडे प्रवित्र स्थळी जत्रा भरली जाते मात्र ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या महितीनुसार गुजरातमधील सूरतमध्ये वर्षातून एकदा स्मशानभूमीत अशी अनोखी जत्रा भरते. या यात्रेत मृताच्या शेवटच्या इच्छेसाठी मृत व्यक्तीच्या आवडत्या वस्तूच अर्पण केल्या जातात, तसेच शमन मंदिरात शिवलिंगावर जिवंत खेकडे सोजले जातात. त्याच प्रमाणे हे खेकडे प्रसाद म्हणून दिले जातात.

जिवंत खेकडे शिवलिंगावर का अर्पण केले जातात सुरतच्या रामनाथ घेला शमशान भूमीच्या.या रुंधनाथ महादेव मंदिरात येणारे भाविक जिवंत खेकडे अर्पण करताना दिसतात. शिवलिंगाला खेकडे अर्पण करणारे भाविक वर्षातून एकदा नवस पूर्ण झाल्यावर या मंदिरात अधिक नवस मागण्यासाठी येतात. माघ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी, वर्षातून एकदा, भक्त अद्वितीय प्रसाद देतात आणि पूजा करतात.  येथे खेकडे अर्पण केल्याने शारीरिक व्याधी दूर होतात अशी लोकांची श्रद्धा आहे. विशेषतः कानांचा बहिरेपणा नाहीसा होतो. मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या हातात इतर प्रसादाव्यतिरिक्त फक्त खेकडे असतात. याला श्रद्धा म्हणा की अंधश्रद्धा, हे तुम्हीच ठरवायचे आहे, पण हेच या अनोख्या जत्रेचे सत्य आहे.

मृतांच्या प्रिय वस्तू अर्पण केले जाते

या शिवमंदिराला भेट देणारे भाविक शिवलिंगाला जिवंत खेकडेच अर्पण करत नाहीत तर ज्या ठिकाणी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जातात त्या ठिकाणी जाऊन प्रार्थनाही करतात. स्मशानभूमीत ज्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत, त्यांची आवडती वस्तू या दिवशी अर्पण केल्या जातात. असे केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात.

स्मशानभूमीची रामयणाशी संबंध या स्मशानभूमीची कथा रामायण काळाशी संबंधित आहे. त्यांच्या मते भगवान श्रीराम चौदा वर्षे वनवासात असताना ते येथून गेले होते. याच ठिकाणी त्यांना त्यांचे वडील दशरथ यांच्या निधनाची बातमी मिळाली होती, म्हणून त्यांनी याच ठिकाणी पिंडदान देऊन मोक्षाची कामना केली. होती अशी देखील मान्यता आहे.

भारतातील मंदिरे जिथे दिला जातो विचित्र प्रसाद भारतातील अनेक मंदिरांमध्ये देवाला नैवेद्य दाखवला जातो. पण भारतात अशीही काही मंदिरे आहेत ज्या मंदिरांमध्ये देवाला मंच्युरियन, नूडल्स , चॉकलेट सारखा नैवेद्य दाखवला जातो. बालसुब्रमनियम मंदिर हे केरळमधील सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात प्रसाद म्हणून भक्तांना चॉकलेट दिलं जातं. तर चायनीज काली मंदिरात चायनीज नूडल्स, मंच्युरियनचा काली देवीला प्रसाद दाखवला जातो. तामिळनाडूतील या प्रसिद्ध मंदिरात देवाला नैवेद्य आणि भक्तांना प्रसाद म्हणून डोसा दिला जातो. काल भैरव मंदिर, उज्जैन काल भैरव मंदिरात जगावेगळा प्रसाद दिला जातो. इथे काल भैरवाला मद्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दिला जातो.राजस्थानमधील या मंदिरात करणी देवी उंदिराच्या रूपात आहे, असा भक्तांचा समज आहे. म्हणून उंदिरांनी चाखलेले दूध भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो.

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | या 5 गोष्टी आत्मसात करा, यशाची प्रत्येक पायरी पार कराल

29January 2022 Panchang | 29 जानेवारी 2022, शनिवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Shani pradosh| आज शनिदेवाला प्रसन्न करण्याचा शुभ योग, त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात येईल ही संधी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.