AI चा सद्गुरुंनाही फटका, नकली व्हिडीओ व्हायरल, कोर्टाने दिले व्हिडीओ हटवण्याचे आदेश

सद्गुरुंचा बनावट AI- तंत्राने डॉक्टरेट केलेले ऑडिओ, व्हिडिओ आणि फोटोंचा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्याने एका संस्थेने या प्रकरणात कोर्टात धाव घेतली होती.

AI चा सद्गुरुंनाही फटका, नकली व्हिडीओ व्हायरल, कोर्टाने दिले व्हिडीओ हटवण्याचे आदेश
| Updated on: May 30, 2025 | 9:45 PM

एआय तंत्रज्ञानाच्या गैरवापरावर अनेक चर्चा सुरु असताना आता त्याचा फटका सद्गुरु यांना देखील बसला आहे. अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सद्गुरुंचे एआयचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत होते. ज्याचा वापर चक्क आपली उत्पादनं विक्री करण्यासाठी होत असल्याचे उघडकीस आल्याने या संदर्भात कोर्टात एक याचिका दाखल झाली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात ईशा फाऊंडेशनने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हे बोगस एआय व्हिडीओ हटवण्याचे आदेश दिले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयात ईशा फाऊंडेशनने एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत सद्गुरुंचे एआयने जनरेट केलेल्या व्हिडीओ आणि फोटो यांचा काही जण आपली उत्पादने विकण्यास करीत असल्याचे म्हटले होते. ही सामुग्री समाजमाध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवरुन हटविण्याची मागणी केली होती. दिल्ली हायकोर्टात शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिल्ली हायकोर्टाने सद्गुरुंच्या व्यक्तीगत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी ही सामुग्री विविध समाज माध्यमांतून हटवण्याचे अंतरिम आदेश शुक्रवारी संबंधित यंत्रणांना दिले.

अनेक सोशल मीडियाचे युजर्स आणि भक्तांनी सद्गुरूंच्या प्रतिमेची बदनामी केल्याने याबद्दल सर्वांचे लक्ष वेधले होते. अनेक प्रकारे सद्गगुरुंचे बोगस एआय आणि बदल केलेले ऑडिओ आणि व्हिडिओ समाज माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल केले आहेत. सद् गुरुंच्या लोकप्रियतेचा वापर करीत या व्हिडीओंचा वापर आपले उत्पदन विक्रीसाठी केल्या जात असून ग्राहकांच्या माथी ती उत्पादन मारली जात होती. दिल्ली हायकोर्टाने या प्रकाराची गंभीर दखल घेत ही सामुग्री तातडीने हटविण्याची मागणी केली आहे.

 आदेशाचे ईशा फाऊंडेशनने केले स्वागत

न्यायालयाच्या या आदेशाचे स्वागत करताना ईशा फाऊंडेशनने सोशल साईट एक्सवर एक पोस्ट केली आहे.त्यात त्यांनी लिहीलेय की, “बोगस एआय-जनरेटेड व्हिडियो, तसेच सद्गुरु यांच्या अटकेच्या खोट्या बातम्या आणि त्यासाठी मॉर्फ्ड इमेजचा वापर केला जात होता. तसेच आर्थिक गुंतवणूकी संदर्भात लोकांना आमीष दाखविणारी सद्गुरुंची छबी आणि व्हिडीओंचा जाहिरातींसाठी वापर केला जात होता. ईशा फाऊंडेशनने अशा बोगस सामुग्रीला हटवणे आणि घोटाळ्यांपासून सामान्य लोकांचे संरक्षण करण्यासाठी सक्रीयपणे काम करीत आहे.”