Diwali 2022: धानोत्रयदशीला अशा प्रकारे करा पूजा, वर्षभर राहील लक्ष्मीचा वास

यंदाच्या दिवाळीला काहीच दिवस शिल्लक आहे. धनत्रयोदशीपासून सुरु होणाऱ्या दिवाळीच्या सणाला किती तारखेपासून सुरुवात होत आहे, जाणून घेऊया.

Diwali 2022: धानोत्रयदशीला अशा प्रकारे करा पूजा, वर्षभर राहील लक्ष्मीचा वास
धनत्रयोदशी Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 4:17 PM

मुंबई,  यंदाच्या दिवाळीला (Diwali 2022) काहीच दिवस शिल्लक आहेत.  यावेळी 23 ऑक्टोबर 2022 रोजी धनत्रयोदशीचा (Dhanteras 2022) सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी खरेदी केल्याने घरात समृद्धी येते अशी मान्यता आहे. या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. यासोबतच कुबेर, लक्ष्मी, गणेश आणि यम यांचीही पूजा केली जाते. शास्त्रात धानोत्रयदशीच्या पूजेविषयी विशेष माहिती देण्यात आलेली आहे. जाणून घेऊया की धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्याची काय पद्धत आहे.

ईशान्य दिशेला पूजेचे महत्त्व

सर्वप्रथम धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पूजेची तयारी करावी. घरातील पूजेचे स्थान ईशान्य दिशेला करावे. पूजेच्या वेळी पूजा करणाऱ्याचे मुख उत्तर, पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. ही दिशा पूजेसाठी अतिशय उत्तम मानली जाते.

पंचदेवांची स्थापना

पूजा करताना पंचदेव म्हणजेच गणपती,  माता दुर्गा, महादेव, विष्णू, सूर्यदेव यांची स्थापना करा. पंचदेवाची प्रतिष्ठापना केल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पूजा करावी. असे केल्याने शुभ फल लवकर प्राप्त होते.

हे सुद्धा वाचा

षोडशोपचार

भगवान धन्वंतरीची षोडशोपचार पूजा करावी. पूजेच्या शेवटी सांगता सिद्धीसाठी दक्षिणा अवश्य द्यावी. यानंतर भगवान धन्वंतरीसमोर धूप, दिवा, हळद, कुमकुम, चंदन, तांदूळ आणि फुले अर्पण करून त्यांचा मंत्र जप करावा.

षोडशोपचार म्हणजे काय?

  1. आवाहन – देवदेवतांना पूजेसाठी आमंत्रण करणे.
  2. आसन – त्यांना स्थानापन्न होण्यासाठी आसन देणे.
  3. पाद्य – त्यांचे पाय धुणे.
  4. अग्ऱ्ये – त्यांचा सन्मान करणे.
  5. आचमनीय – देवाला पिण्यासाठी पाणी देणे.
  6. स्नान – देवदेवतांना अंघोळ घालणे.
  7. वस्त्र – त्यांना वस्त्र नेसवणे.
  8. यज्ञोपवीत – देवांना जानवे घालणे.
  9. अनुलेपन – त्यांच्या कपाळावर गंध लावणे.
  10. पुष्प – त्यांना फुले वाहणे.
  11. धूप – त्यांना उदबत्ती ओवाळणे.
  12. दीप – त्यांना निरांजन ओवाळणे.
  13. नैवेद्य – त्यांना नैवेद्य दाखविणे.
  14. नमस्कार – त्यांना वंदन करणे.
  15. प्रदक्षिणा – देवदेवतांना भोवती फेरी मारणे.
  16. विसर्जन – मंत्रपुष्पांजली म्हणून पूजाविधी समाप्त करणे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.