AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mhada : म्हाडाकडून मोठं दिवाळी गिफ्ट, दिवाळीत 3 हजार घरांची सोडत, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा

MHADA Lottery 2022 : मुंबईत घर घेण्याचं अनेकाचं स्पप्न पूर्ण होणार आहे. यंदाची दिवळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन येणार आहे.

Mhada : म्हाडाकडून मोठं दिवाळी गिफ्ट, दिवाळीत 3 हजार घरांची सोडत, जितेंद्र आव्हाड यांची घोषणा
अंबरनाथच्या म्हाडा टाऊनशीपला मनसेचा विरोधImage Credit source: TV9 Marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 03, 2022 | 6:26 AM
Share

मुंबई : म्हाडाकडून मुंबईकरांना मोठं दिवाळी (mhada lottery 2022) गिफ्ट मिळणार आहे. दिवाळीत म्हाडच्या (Mhada Lottery) तब्बल 3 हजार घरांची सोडत निघणार आहे. जितेंद्र आव्हाड (mhada lottery 2022 mumbai) यांनी आजच ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. त्यामुळे मुंबईत घर घेण्याचं अनेकाचं स्पप्न पूर्ण होणार आहे. यंदाची दिवळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन येणार आहे. पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली लवकरच हे काम पुर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत 3000 घरांची सोडत निघेल, असे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यामुळे आता अनेकजण या घरांच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच म्हाडाने उत्पादन मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे यावेळी जास्त पैसे भरण्याची तयारी मात्र ठेवावी लागणार आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट

अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार

जितेंद्र आव्हड यांची ही मोठी घोषणा म्हणजे म्हडाचं घर घेऊ पाहणाऱ्या अनेकांसाठी आनंदवार्ता आहे. अनेकजण आता पैशांची जुळजुळव करण्याचा तयारीली लागताना दिसत आहेत. कारण मुंबईत घरं घेणं आत्ता सोप राहिलेलं नाही. यंदाची दिवाळी ही अनेकांसाठी हक्काचं घर घेऊन असणारी आहे, त्यामुळे अनेकांना मुंबईत घर घेण्याचं आपलं स्पप्न पूर्ण करता येणार  आहे.

मुंबईत घरं घेण्यासाठी अनेकजण आपली आयुष्यभराची कमाई पणाला लावतात. अशा लोकांना योग्य किंमतीत परवडणारी, स्वस्त घरं मिळावी यासाठी म्हडासारख्या संस्था कार्यरत आहेत. या संस्था अनेकांचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करतात, मात्र अलिकडेच वाढवली उत्पन्न मर्यादा काहीशी चिंता वाढवणार आहे. त्यावरही एकदा नजर टाकूया…

नव्या घरांसाठी किती उत्पन्न मर्यादा?

  1. अत्यल्प गट – वार्षिक 6,00,000 रुपये
  2. अल्प गट – वार्षिक 6,00,001 ते 9,00,00 रुपये
  3. मध्यम गट – वार्षिक 9,00,001 ते 12,00,000 रुपये
  4. उच्च गट – वार्षिक 12,00,001 ते 18,00,000 रुपये

जुनी उत्पन्न मर्यादा किती होती?

  1. अत्यल्प गट – प्रतिमाह 25, 000 रुपयांपर्यंत
  2. अल्प गट – प्रतिमाह 25,000 ते 50,000 रुपयांपर्यंत
  3. मध्यम गट – प्रतिमाह 50,001 ते 75000 रुपयांपर्यंत
  4. उच्च गट – प्रतिमाह 75,001 रुपयांच्या पुढे

पाहा व्हिडीओ :

आता दिवाळीत निघणाऱ्या म्हाडा लॉटरीची सर्वसामान्यांना प्रतिक्षा आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?