AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Electric Bus : एसटीच्या ताफ्यात 2 हजार इलेक्ट्रिक बसेस, अपघात रोखण्यासाठाही उपाययोजना, अनिल परबांची घोषणा

एसटीच्या 2000 गाड्या इलेक्ट्रिक टप्प्या टप्याने येणार आणि 1000 गाड्या CNG गाड्या ताफ्यात घेणार, अशीही माहिती यावेळी परबांनी दिली आहे. तसेच यातील काही गाड्या एसटीच्या मालकीच्या तर काही भाडे तत्वावरील असणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Electric Bus : एसटीच्या ताफ्यात 2 हजार इलेक्ट्रिक बसेस, अपघात रोखण्यासाठाही उपाययोजना, अनिल परबांची घोषणा
अनिल परब, परिवहन मंत्रीImage Credit source: TV9 Marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 02, 2022 | 5:32 PM
Share

मुंबई : अलिकडे वाढते प्रदुषण, इंधनाचे दर (Fuel Price Hike) आणि इंधनाचा तुटवडा पाहता जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Bus) जग वळत आहे. भारतातही हीच मोहीम जोमाने सुरू आहे. आता आपल्या लालपरीच्या म्हणजेच एसटीच्या (St Bus) ताफ्यातही इलेक्ट्रिक बस येणार आहेत. काही दिवसांपूर्वीच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसची घोषणा मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर एसटीच्याही ताफ्यात तब्बल 2000 हजार इलेक्ट्रिक बस येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. ते आज मुंबईत बोलत होते.  एसटीच्या 2000 गाड्या इलेक्ट्रिक टप्प्या टप्याने येणार आणि 1000 गाड्या CNG गाड्या ताफ्यात घेणार, अशीही माहिती यावेळी परबांनी दिली आहे. तसेच यातील काही गाड्या एसटीच्या मालकीच्या तर काही भाडे तत्वावरील असणार, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अपघात कमी करण्यावर भर

दरम्यान याबाबत बोलतान अनिल परब म्हणाले. परिवहन विभागाच्या 115 पैकी 86 सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत, लाखो लोकांना याचा फायदा होईल. महाराष्ट्रातील अपघात रोखण्यासाठी आरटीओ विभाग काम करत आहे. तालुक्यात अपघात होणारे ब्लॅक स्पॉट किती आहेत? त्यात काय सुधारणा करण्यात आल्या? याचा अहवाल मागविण्यात आला आहे. लो स्पीड इलेक्टिक गाड्या हाय स्पीड ने पाळविल्या जात आहेत. त्यामुळे 2 हजार इलेक्टरीक गाड्यावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहितीही परबांनी यावेळी दिली.

कायदा मोडल्यास कडक कारवाई होणार

लो स्पीडचा फायदा घेत कोणी कायदा मोडत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. इलेक्ट्रीक वाहने लो स्पीड बनविण्याचे लायसन्स बनून हाय स्पीड केल्या जात आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असेल तर कारवाई केली जाईल. असा इशारा यावेळी परबांनी दिला आहे. तसे आरटीओतील रिक्त जागा या लवकर भरण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. आता एसटीच्या ताफ्यातही इलेक्ट्रिक वाहनं आल्यानं सहाजिक प्रदुषण कमी होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात इंधन ब

भाडेवाढीबाबत लवकरच निर्णय

तसेच रिक्षा, टॅक्सी भाडे वाढीबाबत सरकार विचाराधीन आहे, त्यामुळे लवकर त्याबाबत निर्णय होईल, असे आश्वासन त्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या भाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी या संघटनांकडून होत आहे. मात्र अजूनही त्यावर निर्णय झाला नाही. मात्र आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर