हवेतच दोन हेलिकॉप्टरची समोरा समोर धडक, धाड धाड कोसळले; तिघांचा मृत्यू
अमेरिकेच्या ओरेगनमध्ये दोन हेलिकॉप्टरची हवेतच भीषण धडक झाली, ज्यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मॅकमिनविल विमानतळाजवळ घडलेल्या या अपघातात एक प्रशिक्षणार्थी आणि दोन अनुभवी वैमानिक ठार झाले. राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळ (NTSB) आणि फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) या घटनेची सखोल चौकशी करत आहेत, ज्यामुळे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

अमेरिकेच्या उत्तर-पश्चिम ओरेगनमध्ये काल दुपारी भीषण दुर्घटना घडली. एका विमानतळाजवळच हवेत दोन हेलिकॉप्टर आमनेसामने आल्याने दोन्हीमध्ये जोरदार धडक बसली. त्यामुळे दोन्ही हेलिकॉप्टर पत्त्यासारखे धाडकन खाली कोसळले. या भीषण दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. त्यामुळे दुर्घटनेच्या परिसरातील एक हायवे तातडीने बंद करण्यता आला. या दुर्घटनेत टेक्सासची फ्लाइट इन्स्ट्रक्चर मॅडी आस्बो, ओरेगन येथील पायलट टायलर स्टर्डिवेंट आणि ब्रिटेनच्या एका ट्रेनी पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती, यमहिल कौंटीचे शरीफ सॅम इलियट यांनी दिली आहे.
मॅडी आस्बो एका हेलिकॉप्टरमध्ये ब्रिटिश शिकाऊ पायलटसोबत होती. तर दुसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये टायलर स्टर्डिवेंट एकटे होते. ही दुर्घटना पोर्टलँडपासून सुमारे 40 मैल दक्षिण-पश्चिमेतील मॅकमिनविल म्यूनिसिपल एअरपोर्टच्या जवळ एका शेतात ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत लाल रंगाचं हेलिकॉप्टर पूर्णपणे तुटून पडलं आहे. तर हिरव्या रंगाचं हेलिकॉप्टर उलटं पडलेलं होतं. घटनास्थळी चोहोबाजूंनी ढिगारा पसरला होता. चौकशी अधिकारी या ढिगाऱ्याचीही तपासणी करत आहेत.
हवेतच धडक
ही दुर्घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता घडली. जवळचा हायवे 233 चा सुमारे एक मैल भाग बंद करण्यात आला होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाच्या आसपास न फिरकण्याचं आवाहन केलं आहे. रोड्रिगेज नावाच्या व्यक्तीने ही दुर्घटना प्रत्यक्ष पाहिली. मी माझ्या कुटुंबासोबत द्राक्षांच्या मळ्यात होतो. अचानक जोरदार धमाक्याचा आवाज आला. वर पाहिल्यावर दोन्ही हेलिकॉप्टर हवेत धडकत असल्याचं आणि नंतर जमिनीवर पडत असल्याचं पाहिलं, असं रोड्रिगेज यांनी सांगितलं.
तपास सुरू
दरम्यान, अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्पोर्टेशन सेफ्टी बोर्डाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एक रॉबिन्सन R-22 होते. याचा वापर प्रशिक्षणासाठी होतो. दुसरा एअरबस AS350 होता. देखभालीशी संबिधत उड्डाणासाठी हे असते. यापैकी एक हेलिकॉप्टर जेरी ट्रिम्बल हेलिकॉप्टर्स कंपनीचे होते. या कंपनीने दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं असून चौकशीला सहकार्य करणार असल्याचं म्हटलं आहे. हे दोन्ही हेलिकॉप्टरची हवेत कशी धडक बसली? याचा शोध अधिकारी घेत आहेत.
