
घरातील चादरी, पडदे आणि भिंतींना कधीही काळा रंग देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार काळा रंग नकारात्मक गोष्टी जास्त आकर्षित करतो.

घरात ज्या भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवत असाल तर तिथे गळती होऊ देऊ नका. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळे आर्थिक संकट येऊ शकतं.

घरातील स्वच्छता करणारा झाडू अशा ठिकाणी ठेवा जो कोणालाही दिसणार नाही. घरात संध्याकाळच्या वेळी झाडू नाही मारावा.

घरात सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते, घराच्या छतावर कचरा, बांबू आणि तुटलेल्या वस्तू ठेवू नयेत.

गुरूवारी घरामध्ये आठवड्यामधून एकदा खाऱ्या पाण्याने घर पुसून घ्या. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घराची उत्तर आणि पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. ती जागा कधीही अस्वच्छ ठेवू नका.