शनिवारी करा हे 5 उपाय शनि देव होतील प्रसन्न, सर्व संकटातून मुक्तता

शनि देवांना हिंदू धर्मामध्ये न्यायाची देवता आणि कर्मफळ दाता म्हणून ओळखलं जातं. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की, शनि देव व्यक्तीच्या त्याच्या कर्मानुसार चांगलं, वाईट फळ देतात.

शनिवारी करा हे 5 उपाय शनि देव होतील प्रसन्न, सर्व संकटातून मुक्तता
| Updated on: Aug 09, 2025 | 8:57 PM

शनि देवांना हिंदू धर्मामध्ये न्यायाची देवता आणि कर्मफळ दाता म्हणून ओळखलं जातं. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की, शनि देव व्यक्तीच्या त्याच्या कर्मानुसार चांगलं, वाईट फळ देतात. जर एखाद्या व्यक्तीवर शनि देव प्रसन्न झाले तर आयुष्यात त्या व्यक्तीला कोणतीच अडचण येत नाही, त्याच्या जीवनात सुखच सुख असतं. परंतु जर शनि देव एखाद्या व्यक्तीवर नाराज झाले तर त्याच्या आयुष्यात अनेक संकटं येतात. अनेकदा लोक कळत नकळत अशा काही चुका करतात, ज्यामुळे शनि देव नाराज होतात, अशा स्थितीमध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे शनि देवांची नाराजी दूर होऊन ते सदैव तुमच्यावर प्रसन्न राहतील, काय आहेत ते उपाय जाणून घेऊयात.

शनिवारी शनि देवांची पूजा

दर शनिवारी शनि देवांची पूजा करावी, शनिवारी तुमच्या घराच्या जवळ असलेल्या शनि मंदिरात जाऊन शनिला मोहरीचं तेल अर्पण करा, सोबतच मंदिरामध्ये दिवा देखील लावावा, ज्यामुळे शनि महाराजांची सदैव तुमच्यावर कृपा राहते.

हनुमान चाळीला वाचा

धार्मिक मान्यतेनुसार तुम्ही जर नित्यनियमानं हनुमान चाळीसेचे पाठ केले तर शनि देव तुमच्यावर प्रसन्न होतात, तुमच्या मागची सर्व संकटं दूर होतात. आयुष्यात सुख समृद्धी येते, भरभराट होते.

गरीबाला दान

शनिवारच्या दिवशी शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गरीब आणि गरजू व्यक्तीला कपडे, अन्न आणि इतर गरजेच्या वस्तूंचं दान करू शकता, ज्यामुळे शनि देव तुमच्यावर प्रसन्न होतील.

शमिच्या झाडाची पूजा 

असं म्हणतात की शनि देवांना शमीचं झाड प्रिय आहे, त्यामुळे दर शनिवारी तुम्ही शमिच्या झाडाची पूजा केली तर तुमचे सर्व दोष दूर होतात, शनि महाराज तुमच्यावर प्रसन्न होतात.

पिंपळाच्या झाडाची पूजा

शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी, झाडाला प्रदक्षिणा माराव्यात तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा, या उपयांमुळे शनि देव तुमच्यावर प्रसन्न होतील, तुमच्या मागची सर्व संकट दूर होतील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)