
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळी दिप प्रज्वलीत करून नतमस्तक झाले.

राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे देखील चैत्यभूमीवर दाखल झाले. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते. त्यांनी बाबासाहेबांच्या संग्रहित छायाचित्रांच्या विभागाला भेट दिली.

चैत्यभूमीवरील स्मृतीस्थळाला पुष्प अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

देशाच्या विकासाचे श्रेय हे बाबासाहेब आंबेडकर यांना जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती स्थळी पुष्प वाहून आदरांजली अर्पण केली.

अजित पवार गटाचे नेते छगण भुजबळ यांनी चैत्यभूमीला भेट देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

उद्धव ठाकरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर दाखल झाले. त्यांनी बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.