या दहा कारणांमुळे हिंदू धर्मात गाईला आहे विशेष महत्व, मृत्यूनंतर मोक्ष प्राप्तीसाठी करते मदत

आपल्याकडे गायीला देवाचे स्थान देण्यात आले आहे. कामधेनु गोमातेचे पूजन केले जाते. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते.

या दहा कारणांमुळे हिंदू धर्मात गाईला आहे विशेष महत्व, मृत्यूनंतर मोक्ष प्राप्तीसाठी करते मदत
गो पुजा
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 01, 2023 | 4:04 PM

मुंबई : हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. कोटी म्हणजे कोटी नव्हे, तर प्रकार. म्हणजे गायीमध्ये 33 प्रकारच्या देवता वास करतात. या देवता आहेत – 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विन कुमार. हे मिळून एकूण 33 होतात. हिंदू धर्मात गाईचं महत्व (Cow Importance in Hindu) मोठ्या प्रमाणात राहिलेलं आहे, कारण प्राचीन काळापासून भारत हा एक कृषी प्रधान देश आहे, आणि गाय ही या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जायची. भारतासारखे अनेक कृषीप्रधान देश आहेत, मात्र भारतात गाईला जेवढं महत्व दिलं जाते तीतके महत्व इतर देशांमध्ये दिले गेलेले नाही हे विशेष

या कारणांमुळे हिंदू धर्मात गाईला विशेष महत्व आहे

  • भगवान शिवाचे आवडते पत्र ‘बिल्वपत्र’ हे शेणापासून तयार झाले आहे.
  • ऋग्वेदाने गायीला अघन्या म्हटले आहे. गाय अद्वितीय असल्याचे यजुर्वेद सांगतो. अथर्ववेदात गायीला संपत्तीचे घर म्हटले आहे.
  • पौराणिक मान्यता आणि आख्यायिकांनुसार गाय हे विष्णूचे रूप आहे, गायी सर्व वेदमयी आहेत आणि वेद गाय आहेत. भगवान श्रीकृष्णांना संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले.
  • भगवान रामाचे पूर्वज महाराज दिलीप हे नंदिनी गाईची पूजा करायचे.
  • भगवान गणेशाचा शिरच्छेद केल्यावर, शिवजींना गाय दान करण्याची शिक्षा झाली आणि पार्वतीला तेच द्यावे लागले.
  • भगवान भोलेनाथांचे वाहन नंदी हा दक्षिण भारतातील अंगोल जातीचा बैल होता. जैन आदि तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचे प्रतीक बैल होते.
  •  गरुड पुराणानुसार वैतरणी पार करण्यासाठी गोदानाचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
  • शास्त्र आणि विद्वानांच्या मते, काही प्राणी आणि पक्षी आहेत, जे आत्म्याच्या विकासाच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत. गाय देखील त्यापैकी एक आहे. यानंतर त्या आत्म्याला मानवी रूपात यावे लागते.
  • गाईच्या दुधाची खीर श्राद्ध कर्मातही वापरली जाते कारण या खीराने पितरांना जास्तीत जास्त तृप्ती मिळते.
  • या देशात लोकांच्या बोलीभाषा, खाण्या-पिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, पण पृथ्वीप्रमाणेच साधी गायही मानवाला काहीही भेद न करता सर्वस्व देते.
  • कत्तलखान्यात जाणार्‍या गायीला वाचवून तिच्या पालनपोषणाची व्यवस्था केल्याने माणसाला गोयज्ञाचे फळ मिळते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)