Durgashtami 2023 : उद्या अधिकमासातील दुर्गाष्टमी, मुहूर्त आणि पुजा विधी

मासिक दुर्गाष्टमी व्रताला देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. 26 जुलैला म्हणजेच उद्या अधिक मासमध्ये दुर्गा अष्टमी व्रत पाळण्यात येईल.

Durgashtami 2023 : उद्या अधिकमासातील दुर्गाष्टमी, मुहूर्त आणि पुजा विधी
दुर्गा माता
Image Credit source: Social Media
Nitish Gadge | Updated on: Jul 25, 2023 | 4:02 PM

मुंबई : हिंदू धर्मात दुर्गाष्टमी (Durgashtami) व्रताला विशेष महत्त्व आहे. मासिक दुर्गाष्टमी व्रताला देवीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी पौराणिक मान्यता आहे. 26 जुलैला म्हणजेच उद्या अधिक मासमध्ये दुर्गा अष्टमी व्रत पाळण्यात येईल. हिंदू कॅलेंडरनुसार, दुर्गाष्टमीचा उपवास प्रत्येक महिन्याच्या आठव्या दिवशी केला जातो. दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा केल्याने जीवनात शक्ती आणि यश मिळते. यासोबतच मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी व्रत केल्यास साधकाला पुण्य लाभते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

आधिक मासमधील दुर्गा अष्टमीचा शुभ मुहूर्त

हिंदू कॅलेंडरनुसार, श्रावण अधिक मासमधील अष्टमी तिथी 25 जुलै 2023 रोजी दुपारी 15.09 पासून सुरू होईल, जी 26 जुलै रोजी दुपारी 3.53 पर्यंत चालेल. उदय तिथीनुसार 26 जुलैलाही दुर्गा देवीची पूजा करता येते.

अशी करा दुर्गाष्टमीला मातेची पूजा

  • दुर्गाष्टमीला सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • दुर्गादेवीच्या मूर्तीला नमस्कार करून उपवासाचा संकल्प घ्या.
  • पूजा घरातील चौरंगावर दुर्गा माताची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा.
  • देवीची षोडशोपचार रूपात पूजा करावी.
  • पूजेत माता दुर्गाला लाल फुले आणि लाल वस्त्र अर्पण करा.
  • सोळा शृंगार आणि लाल चुनरीसुद्धा अर्पण करायला विसरू नका.
  • पूजेच्या शेवटी दुर्गा चालिसाचे पठण करावे.
  • दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रामुख्याने कन्यापूजनाचे आयोजन केले जाते. म्हणूनच या दिवशी मुलीची पूजा केल्यानंतर मुलींना लाल रंगाच्या वस्तू अर्पण करा. असे केल्याने माता भगवतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
  • दुर्गा अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रोपाजवळ किमान नऊ दिवे लावा नंतर त्यांची प्रदक्षिणा करा. असे मानले जाते की असे केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते आणि सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us