जमिनीवर पडणारे पदार्थ म्हणजे भूतांचे अन्न, खाली पडलेले पदार्थ खाऊ नका, अन्यथा…

भारतीय संस्कृतीत जेवण करण्याला एक यज्ञ म्हणून संबोधले जाते. त्यामुळे जेवण करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. हे नियम तोडल्यास आपल्याला त्रासाचा सामना करावा लागू शकतो.

जमिनीवर पडणारे पदार्थ म्हणजे भूतांचे अन्न, खाली पडलेले पदार्थ खाऊ नका, अन्यथा...
Food Eating Rule
Image Credit source: Meta AI
| Updated on: Jun 30, 2025 | 10:01 PM

अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. शरीराला ताकद देण्यासाठी प्रत्येकाला दररोज जेवण करावे लागते. यामुळे शरीरात नवी ऊर्जा संचारते. हिंदू धर्मात अन्न एक पवित्र कर्म मानले जाते. भारतीय संस्कृतीत जेवण करण्याला एक यज्ञ म्हणून संबोधले जाते. त्यामुळे जेवण करताना काही नियम पाळणे गरजेचे आहे. हे नियम तोडल्यास आपल्याला त्रासाचा सामना करावा लागू शकतो, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धार्मिक मान्यतेनुसार, अन्नाचा प्रत्येक घास ब्रह्माला अर्पण केला जातो. त्यामुळे आपण जेवण करतो तेव्हा आपल्याभोवती अदृश्य शक्तींचा संचार असतो. हिंदू धर्मग्रंथांनुसार आपण जेवण करताना देव, पूर्वज आणि अदृश्य शक्ती (भूत- प्रेत), तिघेही उपस्थित असतात. ब्रह्मा आपल्या अन्नात वास करतो. त्यामुळे जेवण करण्यापूर्वी बरेच लोक ‘ब्रह्मार्पणं ब्रह्मा हविर्ब्रह्मग्नौ ब्राह्मण हुतम्। ब्रह्मैव तेन गांतव्य ब्रह्मकर्मसमाधीना’ या मंत्राचा जप करतात.

खाली पडलेले अन्न का खाऊ नये?

हिंदू धर्मग्रंथांनुसार, जेवण करताना जर अन्न खाली पडले तक ते खाणे टाळावे कारण तुम्हा जेवण करताना तुमच्याभोवती अदृश्य शक्ती वास करतात. जर तुमचे अन्न जेवताना खाली पडले तर ते भूतं खातात. त्यामुळे असे अन्न चुकूनही खाऊ नये. याचा परिणाम वाईट होऊ शकतो. खाली सांडलेले अन्न खाल्ल्याने तुमच्या आत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

नकारात्मक ऊर्जा

धार्मिक मान्यतेनुसार, जेवण करत असताना तुमच्या आजूबाजूला अदृश्य ऊर्जा असते. त्यामुळे जर तुम्ही रागाने किंवा खराब मनस्थितीत जेवत असाल तर नकारात्मक ऊर्जेचा नकारात्मक परिणाम होऊ शकते. त्यामुळे शांत मनाने आणि आनंदांने जेवण करा, यामुळे शरीराला अन्न शोषण्यास मदत होते आणि आरोग्यही चांगले राहते. तसेच तुम्हाला सकारात्मक ऊर्जा जाणवते.

टीव्ही किंवा फोन पाहत जेवण टाळा

सध्या अनेकजण जेवण करताना टीव्ही पाहतात किंवा फोनचा वापर करतात. हिंदू धर्मानुसार या सवयींमुळे तुमची एकाग्रता भंग होऊ शकते. यामुळे तुमच्या सभोवतालच्या अदृश्य शक्तींचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो. हे टाळण्यासाठी जेवण करताना तुम्ही शांत आणि एकाग्र असावे. कारण अन्न हे केवळ तुमचे पोट भरत नाही तर आत्म्याला ऊर्जा देण्याचे एक माध्यम आहे. त्यामुळे नेहमी अन्नाचा आदर करा आणि प्रसन्न मनाने जेवण करा.

टीप – ही माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे, टीव्ही 9 मराठी या माहितीची पुष्टी करत नाही.