Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी ‘हे’ खास उपाय केल्यास आयुष्यातील संकट होतील दूर….

Pradosh Vrat Puja Niyam: हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप खास मानले जाते. महिन्यात दोन प्रदोष व्रते असतात. प्रदोष व्रत महादेवाला समर्पित आहे. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या दिवशी उपवास आणि पूजेसोबत काही उपाय देखील केले जातात.

Pradosh Vrat: प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी हे खास उपाय केल्यास आयुष्यातील संकट होतील दूर....
प्रदोष व्रत
Image Credit source: टीव्ही 9 हिंदी
| Edited By: | Updated on: Mar 12, 2025 | 5:08 PM

देवांचे देव महादेव यांची हिंदू धर्मामध्ये पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये असे अनेक सण साजरा केले जातात ज्यामध्ये उपवास देखील केले जाते. सनातर धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्तव दिले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा आणि व्रत केले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी आणि शुक्ल पक्षाच्या तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. दर महिन्याला प्रदोष व्रत केले जाते. तुमच्या आयुष्यामधील संकट दूर करण्यासाठी आणि महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रदोष व्रताचा उपवास फायदेशीर मानला जातो. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि विधिनुसार, व्रत केल्यामळे महादेवाचे आशिर्वाद तुम्हाला प्राप्त होतात.

प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा नेहमी प्रदोष काळामध्ये केली जाते. या दिवशी तुमच्या मनातील विचार सकारात्मक ठेवा. प्रदोष व्रताच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. हिंदू धार्मिक श्रद्धेनुसार, जो कोणी प्रदोष व्रताच्या दिवशी योग्य विधींसह महादेवाचे उपवास आणि पूजा करतो, त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे आणि वेदना दूर होतात आणि चिंता संपतात. प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी राहते.

प्रदोष व्रताच्या दिवशी उपवास आणि पूजेसोबत काही उपाय देखील केले जातात. या दिवशी शास्त्रांमध्ये महिलांसाठी काही विशेष उपाय सांगितले आहेत. जर महिलांनी हे उपाय अवलंबले तर त्यांच्या आयुष्यात कोणतीही समस्या येणार नाही. हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी उद्या म्हणजेच 11 मार्च रोजी सकाळी 8:13 वाजता सुरू होत आहे. ही तारीख 12 मार्च रोजी सकाळी 9:11 वाजता संपेल. अशा परिस्थितीत उद्या प्रदोष उपवास पाळला जाईल. उद्या पूजेचा शुभ काळ संध्याकाळी 6:47 ते रात्री 9:11 पर्यंत असेल. उद्या मंगळवार आहे, म्हणून त्याला भौम प्रदोष व्रत असे म्हणतात.

प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी हे उपाय करावे…..

प्रदोष व्रताच्या दिवशी महिलांनी प्रदोष काळात किंवा दिवसभरात कधीही सात दाणे पिवळे तांदूळ घ्यावेत. नंतर, तुमचे नाव आणि गोत्र सांगितल्यानंतर, ते शिवलिंगाला समर्पित करा. हा उपाय पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडावरही करता येतो, परंतु शिवलिंगावर किंवा या झाडांवर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी पाणी अर्पण करावे हे लक्षात ठेवा. तसेच अगरबत्ती पेटवा. या दिवशी महिलांनी माती किंवा पिठाचा दिवा बनवावा आणि त्यात शिव-शक्तीच्या नावाने दोन वाती ठेवाव्यात. नंतर दिवा लावल्यानंतर, तो तळहातावर घ्यावा आणि भगवान शिवाच्या मंदिरात किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवावा. प्रदोष व्रताच्या दिवशी विवाहित महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या दान कराव्यात. पार्वती मातेला सिंदूर, बिंदी आणि मेहंदी लावावी.