Feng Shui : दिवाळीपूर्वी घरी आणा या पाच खास वस्तू, होईल भाग्योदय
फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. या शास्त्राचा उगम चिनमध्ये झाला मात्र त्यानंतर हळुहळु फेंग शुईचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला. फेंग शुईमध्ये काही वस्तूंना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. आज आपण अशाच काही वस्तूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या वस्तू घरात आवश्य असाव्यात असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.

फेंग शुई हे एक चिनी वास्तुशास्त्र आहे. ज्याचा उगम हा चिनमध्ये झाला. परंतु त्यानंतर हळुहळु संपूर्ण जगभरात फेंग शुईचा प्रसार झाला. ज्याप्रमाणे वास्तुशास्त्र हे नकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा अशा दोन मुख्य घटकांवर कार्य करतं, त्याचप्रमाणे फेंग शुई देखील याच दोन प्रमुख घटकांवर कार्य करतं. फेंग शुईमध्ये काही वस्तू या अत्यंत शुभ माण्यात आल्या आहेत. फेंग शुईशास्त्रानुसार या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर सर्व प्रकारच्या वाईट शक्तिंपासून तुमच्या घराचं संरक्षण होईल, तसेच तुमच्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू राहील, तुमच्या पैशांसंबंधी ज्या काही अडचणी आहेत, त्या देखील दूर होतील, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे. चलातर मग जाणून घेऊयात या वस्तूंबद्दल.
कासव – फेंग शुईमध्ये कासवाला अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. ज्या घरात कासवाची मूर्ती आहे, त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही, असं फेंग शुईमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घरात नेहमी कासवाची एक तरी मूर्ती असावी असा सल्ला फेंग शुईमध्ये देण्यात आला आहे.
तीन पायाचं बेडूक – फेंग शुईमध्ये तीन पायाच्या बेडकाला देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. ज्या घरात पैसा टिकत नाही, खूप कष्ट करून देखील यश मिळत नाही, अशा घरामध्ये एकतरी तीन पायाची बेडकाची मूर्ती असावी, असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.
हत्तीची मूर्ती – फेंग शुईमध्ये हत्तीच्या मूर्तीला देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. फेंग शुईनुसार ज्या घरात हत्तीची मूर्ती असते त्या घरात कधीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. अशा घरात कधीही पैशांची कमी नसते.
हॅप्पी मॅन – फेंग शुईमध्ये हॅप्पी मॅनला देखील अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. हॅप्पी मॅनमुळे घरातील वातावरण हे सकारात्मक राहण्यास मदत होते.
शिंपले – फेंग शुईमध्ये शिपल्यांना देखील शुभ माण्यात आलं आहे, तुम्ही घरात शिंपले आणून पाण्यात ठेवू शकतात. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होते.