Friday Upay: शुक्रवारच्या दिवशी करा हे पाच सोपे उपाय, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण

शुक्रवार (Friday Upay) हा शुक्र ग्रह किंवा शुक्रदेव यांच्याशी देखील संबंधित मानला जातो. शुक्रदेव हा सुख, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो.

Friday Upay: शुक्रवारच्या दिवशी करा हे पाच सोपे उपाय, कधीच भासणार नाही आर्थिक चणचण
माता लक्ष्मी
Image Credit source: Social media
Nitish Gadge | Updated on: Jan 12, 2023 | 7:58 PM

मुंबई, शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी भक्त देविला प्रसन्न करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद मिळण्यासाठी उपवास ठेवतात. या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक मातेची पूजा केली जाते. माता लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि तीच्या आशिर्वादाने भक्ताच्या आयुष्यात कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता भासत नाही. शुक्रवार (Friday Upay) हा शुक्र ग्रह किंवा शुक्रदेव यांच्याशी देखील संबंधित मानला जातो. शुक्रदेव हा सुख, सौंदर्य आणि प्रणय यांचा कारक मानला जातो.

 

या मंत्राचा करा जाप

असे मानले जाते की शुक्रवारी काही विशेष उपाय पूर्ण भक्ती आणि समर्पणाने केल्यास जीवनात सदैव आशीर्वाद मिळतात. शुक्रदेवाच्या कृपेने जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता भासत नाही. चला जाणून घेऊया या खास उपायांबद्दल. माता लक्ष्मी आणि शुक्राचा आशीर्वाद मिळविण्यासाठी शुक्रवारचा उपवास हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. या दिवशी शुक्रदेवाचा विशेष मंत्र “ओम शुन शुक्राय नमः” किंवा “ओम हिमकुंडमृणालाभम् दैत्यानान परमं गुरुम् सर्वशास्त्रं प्रवर्तकं भार्गवम् प्रणमयाहम्” या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते.

  • माता लक्ष्मी आणि शुक्रदेव कधीच घाणीत राहत नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला त्यांचा आशीर्वाद हवा असेल तर तुमच्या आसपासचे वातावरण शुद्ध ठेवा आणि घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या.
  • शुक्रवारचा संबंध पांढऱ्या रंगाशी आहे, त्यामुळे या दिवशी हा रंग जास्तीत जास्त वापरावा.
  • शुक्रवारी पांढर्‍या रंगाचे कपडे परिधान करूनच पूजा करावी.
  • व्रतासह या दिवशी शुक्र ग्रहाशी संबंधित वस्तूंचे दान करणे देखील शुभ आहे. तांदूळ, दूध, दही, मैदा आणि साखरेची मिठाई यासारख्या पांढर्‍या रंगाच्या वस्तूंचे दान शुक्रवारी करता येते. याशिवाय शुक्रवारी मुंग्या आणि गायींना पीठ खाऊ घालण्याने शुक्रदेवाची कृपा होते.
  • भगवान विष्णूशिवाय माता लक्ष्मीची पूजा अपूर्ण मानली जाते, म्हणूनच शुक्रवारी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा करावी. यामुळे धन-धान्य आणि वैभव प्राप्त होते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us