
Gajlaxmi Rajyog in Gemini 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, राक्षसांचे गुरू शुक्र आणि देवतांचे गुरू बृहस्पती यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानण्यात आली आहे. जेव्हा पण हे दोन ग्रह चाल बदलतात. तेव्हा त्याचा परिणाम दिसून येतो. या जुलै महिन्यात हे दोन्ही ग्रह मिथुन राशीत गोचर करत आहेत. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या तीन राशींसाठी हे स्थित्यंतर अत्यंत लाभदायक आणि बक्कळ कमाई करून देणारे ठरणार आहे. या राशींची भरभराट होईल. त्यांना पद, मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र प्रत्येक महिन्यात एका राशीतून दुसर्या राशीत गोचर अर्थात भ्रमण करतो. तर गुरूला एका राशीतून दुसर्या राशीत जाण्यासाठी 12 महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या भाग्य आणि ज्ञान प्रदाता गुरू मिथुन राशीत आहे. 26 जुलै रोजी सौंदर्य आणि सुखदायक शुक्र हे मिथुन राशीत विराजमान होतील. त्यामुळे जुलै महिन्याच्या अखेरीस जवळपास 12 वर्षानंतर मिथुन राशीत गुरू-शुक्र यांची युती होऊन गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तो 21 ऑगस्टपर्यंत असेल.
या राशींचे नशीब फळफळणार
मिथुन राशी : 12 वर्षानंतर मिथुन राशीत गजलक्ष्मी राजयोग हा भाग्यवर्धक ठरेल. समाजात मान-सन्मान वाढेल. मूल होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. दीर्घकाळापासून थांबलेले आणि फसलेली कामे आता मार्गी लागतील. भाग्याची साथ मिळेल. तुमच्या कमाीत वृद्धी होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात एखादा सरकारी प्रकल्प, काम तुम्हाला मिळू शकते. कुटुंबासोबत छान वेळ जाईल.
कुंभ राशी : शुक्र गुरुची युती आणि गजलक्ष्मी राजयोगमुळे या राशीतील व्यक्तींचे नशीब फळफळेल. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. भाग्य तुमची साथ देईल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. पदोन्नती आणि वेतन वृद्धीचे गिफ्ट मिळेल. शिक्षण क्षेत्रात मोठी झेप घ्याल. प्रेम संबंधात येणार्या अडचणी दूर होतील. उधार दिलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभ होईल. एखाद्या योजनेत पैसा गुंतवण्याचा विचार करत असाल तर फायदा होईल.
तुला राशी : गजलक्ष्मी राजयोग या राशीला लाभदायक ठरेल. तुमचा आत्मविश्वास दुनावेल. उच्च शिक्षणाची संधी मिळेल. नोकरीत पदोन्नती, वेतनवृद्धीचा योग जुळून येईल. या काळात प्रवास घडू शकतो. अध्यात्माकडे तुमचे मन झुकेल. मुलांकडून चांगली बातमी या काळात मिळू शकते. भौतिक सुख सोयी मिळतील. व्यापार, व्यवसायात फायदा होईल. कामाच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी मिळतील.
डिस्क्लेमर : येथे देण्यात आलेली माहिती श्रद्धा, ज्योतिष, पंचांग, धार्मिक ग्रंथ आणि माहितीवर आधारीत आहे. टीव्ही 9 मराठी त्याला दुजोरा देत नाही. तुमच्या ज्योतिषाचा सल्ला आवश्यक घ्या.