Raj Yoga : हंस राजयोगामुळे राशींचे चमकते भाग्य, धन, संपत्तीची प्राप्ती, गुरूची राहते नेहमी कृपा, तुमची रास यात आहे का?
Hans Raj Yoga : वैदिक ज्योतिषानुसार, ज्या लोकांच्या कुंडलीत हंस योग तयार होतो. ते लोक चमकदार काम करतात. त्यांचे नशीब जोरावर असते. त्यांच्यावर गुरूची कृपा असते. या राशींचे चमकते नशीब....

ज्योतिष शास्त्रात पंचमहापुरूष राजयोगाचे वर्णन येते. हा राजयोग 5 ग्रहांच्या प्रभावाने तयार होतो. हंस महापुरुष राजयोग हा त्यातीलच एक आहे. ज्योतिषानुसार, गुरू बृहस्पती हा राजयोग तयार करतात. जर हा राजयोग एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत तयार होत असेल तर तो अध्यात्म आणि ज्योतिष या क्षेत्रात मोठे नाव कमावतो. इतकेच नाही तर इतर क्षेत्रातही त्याला मोठे पद मिळते. त्याला पैशाची चणचण भासत नाही. पैसा हाती खेळता असतो. कसा तयार होतो हा राजयोग?
कुंडलीत असा तयार होतो हा राजयोग?
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु ग्रह लग्न वा चंद्राच्या पहिल्या, चौथ्या, सातव्या अथवा दहाव्या भावात कर्क, धनु अथवा मीन राशीत असतो, तेव्हा हंस योग तयार होतो. तर गुरू बृहस्पतीचा योग्य जुळून आल्यास व्यक्तीला पूर्ण फळाची प्राप्ती होते. तर कोणत्याही ग्रहाची शुभ कटाक्ष या राजयोगाला अधिक बळ देतो. मजबूत करतो.
या व्यक्ती असतात धार्मिक आणि आस्तिक
हंस राजयोगात जन्मलेल्या व्यक्ती धार्मिक आणि आस्तिक असतात. त्यांचे व्यक्तित्व आकर्षक असते. हे लोक स्वभावाने सरळ आणि सुशील असतात या लोकांचा देवावर पूर्ण विश्वास असतो. त्यांचा गूढ आणि ज्योतिष विद्येकडे ओढा असतो. हंस राजयोगामुळे व्यक्ती धार्मिक संस्था, सामाजिक संस्थांमध्ये काम करतो.
अपार संपत्ती आणि धन
कुंडलीत हंस राजयोग असेल तर अशा व्यक्तीकडे संपत्ती आणि पैशांची कमतरता नसते. या लोकांच्या राशीत पैशांची रास असते. यामध्ये काही जण प्राध्यापक, शिक्षक सुद्धा असतात. काही ज्योतिषी असतात. काही जण रत्नशास्त्र, हस्तशास्त्राचे अभ्यासक असतात. या लोकांना समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा असते. त्यांचा कल अध्यात्म, धार्मिक कार्य, ज्योतिष, गूढ विज्ञान याकडे असतो. त्यांचा संसारसोबतच भक्तीभावात अधिक रस असतो. त्यांना ज्योतिष विद्याचे ज्ञान समजावून घेण्यात रस असतो.
डिस्क्लेमर : उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. टीव्ही 9 मराठी याविषयीचा दावा करत नाही
