AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाचे नेते, खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल, हृदयाशी संबंधित आजार….

भाजपाचे नेते नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयाशी संबंधित उपचारासाठी नारायण राणे यांना रुग्णालयात दाखल केल्याचे म्हटले जात आहे. तब्येतीच्या कारणांवरुन नारायण राणे अलिकडेच निवृत्तीचे संकेत दिले होते.

भाजपाचे नेते, खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल, हृदयाशी संबंधित आजार....
narayan rane admitted in hospital
| Updated on: Feb 10, 2026 | 8:54 PM
Share

भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नारायण राणे यांच्यावर हृदयाशी संबंधित उपचार होणार आहेत त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अलिकडे कोकण दौऱ्यावर असताना नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले होते. आता आपण किती करणार, दोन्ही मुले कतृत्वान असून त्यांना नांदा सौख्यभरे असा आशीवार्द देखील त्यांनी एका सभेत दिला होता.

भाजपाचे नेते नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांना हृदयाशी संबंधित आजारावर उपचार करण्यासाठी जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक नगर पंचायतीच्या निवडणूकांमध्ये भाजपाने मिळवलेल्या यशानंतर नारायण राणे यांचा कणकवलीत सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात आता आपण थकलो आहोत, आणि किती करणार याला काही मर्यादा असल्याच्या आशयाचे वक्तव्य केले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी आपली दोन्ही मुले कतृत्ववान असून त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असल्याचे म्हटले होते. त्यांना आशीर्वाद देताना नांदासौख्य भरे असा आशीवार्द देखील त्यांना दिला होता.

राजकारणातून निवृत्ती

कोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत नारायण राणे पूत्रांमध्ये वाद झाले होते. निलेश आणि नितेश राणे या दोन्ही बंधूंनी एकमेकांवर आणि पक्षावर जोरदार टीका केली होती. भाजपा नेते नारायण राणे यांनी निवडणूका झाल्यानंतर कणकवलीत सत्कार समारंभाला उत्तर देताना आता दोघांमध्ये काहीही वाद नाहीत आता निवडणूका संपल्या आहेत असे सांगत या वादावर पडदा टाकला होता. यावेळी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे संकेतही दिले होते. आपण भाजपमध्ये आल्यावर सांगितल होतं की भाजप हा माझ्या आयुष्यातील शेवटचा पक्ष आहे.  एक मात्रे आहे की मी जगेन तर मानाने जगेन, असं मानणारा आहे असेही राणे यावेळी म्हणाले होते. राणे यांची तब्येत नीट नसल्याने त्यांनी आता आपल्याला काही नको. आपण सर्व मिळवले आहे. आता मी व्यवसाय सांभाळेन, मुलांनी राजकारणात मोठे व्हावे असे म्हणत राजकीय निवृत्तीच जाहीर केल्याचे म्हटले जात होते.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर