AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार…! मद्यधुंद टँकर चालकाने मध्यरात्री डिलिव्हरी बॉयला उडवलं, तरुणाचा जागीच मृत्यू

mumbai hit and run case : मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये हिट अँड रनची घटना घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे .

मुंबईत पुन्हा हिट अँड रनचा थरार...! मद्यधुंद टँकर चालकाने मध्यरात्री डिलिव्हरी बॉयला उडवलं, तरुणाचा जागीच मृत्यू
| Updated on: Jul 04, 2026 | 11:00 AM
Share

मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिममध्ये मध्यरात्री हिट अँड रचना थरार घडला. एका भरधाव टँकरने दुचाकीवरील डिलिव्हरी बॉयला उडवल्याची घटना घडली आहे. टँकरच्या जोरदार धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु स्थानिकांनी चालकाच्या मुसक्या आवळल्या. ओशिवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पळून जाणारा आरोपी चालक आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमच्या अमृत नगरमधील अजीत ग्लास गार्डन गेटजवळ शनिवारी मध्यरात्री 1.20 वाजता अपघात झाला. या अपघातात हर्ष नावाच्या डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. तो मध्यरात्री उशिरा डिलिव्हरी बॉयचे काम करूण कुटुंबाचा उदारनिर्वाह करत होता. या अपघाताची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ओशिवरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, टँकर चालक हा दारूच्या नशेत होता. नशेत असल्याने त्यानं वाहनावरील नियंत्रण गमावलं. त्यानंतर या टँकर चालकाने दुचाकीस्वार हर्षच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हर्षच्या दुचाकीला धडक दिल्याने चालकाने टँकरचा वेग वाढवला आहे. त्याला घटनास्थळावरून पळ काढायचा होता. परंतु स्थानिकांनी टँकर चालकाचा पाठलाग करून त्याला पोलिसांत नेले. अपघातानंतर घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात आरडाओरड झाली. पोलिसांनी घटनस्थळावरून हर्षचा मृचदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

पोलिसांकडून कारवाई

ओशिवारा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले. पोलिसांनी त्याचा टँकर देखील ताब्यात घेतला आहे. स्थानिकांनी टँकर चालक नशेत असल्याचा दावा केल्यानंतर पोलिसांनी त्याची मेडिकल टेस्ट देखील केली आहे. टँकर चालकाने नेमकी किती दारू प्यायली होती, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीला कठोरातील कठोर कारवाई व्हावी, यासाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे.

Follow Us
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा