हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात…
मुंबईसह उपनगरीय भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने काही भागांना रेड अलर्ट जारी केला असून प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान, विरार पालिकेच्या मुख्य कार्यालय परिसरातील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयत जाण्याच्या मार्गातच गुडघाभर पाणी साचलं आहे. तेसच कार्यलय परिसरा बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले असून वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे.
स्थानिक प्रशासनाकडून पाणी उपसा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाने पुढील 24 तासांत आणखी जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Published on: Jul 04, 2026 11:17 AM
मला महिला आयोगाची अध्यक्ष करा मग... गिरीजा राऊत प्रकरणी बोलताना करुणा
सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ;
पेपरफुटीतील एकालाही सोडणार नाही! दादा भुसेंचा मोठा इशारा...
लग्न झाल्याच्या दीड वर्षातच भयंकर.... एकीकडे लेकीच्या बारशाची लगबग