AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...

Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात…

| Updated on: Jul 04, 2026 | 10:33 AM
Share

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता शहरातील जुन्या आणि धोकादायक झाडांनाही बसू लागला आहे. दादरमधील मीनाताई फुल मार्केट परिसरात सुमारे 100 वर्षे जुने वडाचे झाड कोसळल्याची घटना घडली असून, या दुर्घटनेत फुल मार्केटच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे.

माहितीनुसार, ही घटना मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली. अचानक वडाचे विशाल झाड थेट फुल मार्केटच्या शेडवर कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने घटना मध्यरात्री घडल्यामुळे त्या वेळी मार्केटमध्ये कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

स्थानिक फुल विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, हे झाड अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत होते. याबाबत वारंवार मुंबई महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही झाड हटविण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. अखेर मुसळधार पावसात हे झाड कोसळल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान, मुंबईत सतत पडणाऱ्या पावसामुळे विविध भागांत झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून, धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर पालिकेच्या पावसाळ्यापूर्वीच्या तयारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Published on: Jul 04, 2026 10:33 AM

Follow Us