AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिरातील दानावर डल्ला… सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया… दोन शब्दात बोलले काय?

RSS Chief Mohan Bhagwat on Ram Mandir Offerings Theft: राम मंदिरातील दानपेट्टीवर डल्ला मारल्याचे समोर आले आहे. कोट्यवधींचे दान, सोने चोरण्यात आले आहे. आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तर चंपत राय यांच्यासह अजून दोघांचाही लवकरच नंबर लागण्याची शक्यता आहे. याविषयावर सरसंघचालकांनी अशी प्रतिक्रिया दिली.

राम मंदिरातील दानावर डल्ला... सरसंघचालक मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया... दोन शब्दात बोलले काय?
राम मंदिर, मोहन भागवतImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 04, 2026 | 11:41 AM
Share

Mohan Bhagwat Reaction: अयोध्येतील रामलल्लाच्या दानपेटीवर विश्वस्त मंडळासह कर्मचाऱ्यांनीच मोठा डाका टाकला. लाखो श्रद्धाळूंच्या श्रद्धेला धक्का बसला. प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर चंपत राय आणि इतर दोन विश्वस्तांच्या मागे चौकशीचा ससेमिरा आणि अटकेची टांगती तलवार आहे. काल परवा संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी एक्सवर एक पोस्ट केली. त्यात राम मंदिरातील अपहार हा समाजाच्या श्रद्धेला धक्का असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यानंतर याविषयावर सरसंघचालक विश्वस्तांसह सरकारचे कान टोचतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण त्यांच्या त्रोटक प्रतिक्रियेने रामभक्तांचा हिरमोड झाला आहे.

दोनच शब्दात विषय आटोपला

माध्यम प्रतिनिधींनी सरसंघचालकांना गरडा घातला. त्यांना राम मंदिरातील दानपेटीतील चोरीवर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा पुढे जात भागवतांनी दोनच शब्दात विषय आटोपला. राम… राम, असे दोनच शब्द ते म्हणाले. त्यांच्या या त्रोटक प्रतिक्रियेने राम भक्तांचा हिरमोड मात्र झाला. भागवत राम मंदिरांची कोनशिला आणि मुर्ती प्रतिष्ठापनावेळी हजर होते. इतक्या गंभीर विषयात निदान त्यांनी यंत्रणा, प्रशासनाला खडसावणे अभिप्रेत होते. त्यांनी राम राम असे म्हणत विषय आटोपता घेतला.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची भूमिका समोर

अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणावरून देशात तीव्र संताप आहे. त्यावर शुक्रवारी संघाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी ही चोरीची घटना अत्यंत दुर्दैवी असून संपूर्ण समाजाच्या आणि रामभक्तांच्या श्रद्धेला धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली. या घटनेने संघ अत्यंत व्यथित झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची आणि दोषींना शिक्षा देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा आंदोलन

राम मंदिरातील दानपेटी अपहार प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. काँग्रेससह समाजवादी नेत्यांनी भाजपवर तोफ डागली आहे. इकडे मुंबईत उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी रामरक्षा आंदोलनाची हाक दिली आहे. 5 जुलै रोजी दादर येथील हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन करण्यात येणार आहे. राम मंदिरातील पैशावर डल्ला मारून खासदार आणि आमदार फोडण्यासाठी तो पैसा वापरल्याचा गंभीर आरोपही काल उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ