AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर

Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर

| Updated on: Jul 04, 2026 | 10:15 AM
Share

महाराष्ट्रात मान्सूनने अखेर जोरदार हजेरी लावली असून, राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाचा जोर वाढल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज खरा ठरत मध्यरात्रीपासून कल्याण-डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरू झाला. सततच्या पावसामुळे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील आंबेडकर रोड पाण्याखाली गेला असून, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत असून, वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाल्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे रस्ते वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली होती. मात्र, हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर शहरातील काही भागांत पुन्हा पावसाने जोर धरला असून, पुढील काही तासांत पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकल रेल्वे सेवा सध्या सुरू असली तरी काही मार्गांवर गाड्या पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Jul 04, 2026 10:15 AM

Follow Us